Join us  

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सनं नोंदवला '१०' नंबरी विक्रम; अजून कुणालाच नाही जमला हा पराक्रम

CSK vs SRH Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील Play Off च्या शर्यतीत कायम राखण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सवर ( Chennai Super Kings) 'करा किंवा मरा' हे संकट कायम आहेच.

By स्वदेश घाणेकर | Published: October 14, 2020 8:00 AM

Open in App

CSK vs SRH Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मधील Play Off च्या शर्यतीत कायम राखण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सवर ( Chennai Super Kings) 'करा किंवा मरा' हे संकट कायम आहेच. सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) विरुद्धच्या परतीच्या सामन्यात MS Dhoniनं आक्रमक रणनीती वापरली. फलंदाजांच्या क्रमवारीत थोडासा बदल अन् गोलंदाजीतले डावपेच याच्या जोरावर चेन्नईनं हा सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) या विजयासह IPLमध्ये एका भारी विक्रमाला गवसणी घातली. आतापर्यंत एकाही संघाला असा पराक्रम करता आलेला नाही.

फॅफ ड्यू प्लेसिस ( ०) पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर सलामीला आलेल्या सॅम कुरनने ३१ धावा केल्या. शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. खलील अहमदनं SRHला यश मिळवून देताना रायुडूला ( ४१) बाद केले. वॉटसन ३८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा करून माघारी परतला. धोनी १३ चेडूंत २१ धावा करून माघारी परतला. रवींद्र जडेजानं १० चेंडूंत २५ धावा करताना चेन्नईला ६ बाद १६७ धावांचा पल्ला गाठून दिला. 

लक्ष्याचा पाठलाग करताना SRHचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( ९) व मनीष पांडे ( ४) फारवेळ खेळपट्टीवर टीकले नाही.  जॉनी बेअरस्टो व केन विलियम्सन यांनी हैदराबादचा डाव सावरला, परंतु रवींद्र जडेजानं SRHला धक्का दिला. बेअरस्टो २३ धावांवर त्रिफळाचीत झाला.  लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या SRHला पहिल्या १० षटकांत तीन धक्के बसले. पण, केन खिंड लढवत होता. केननं ३९ चेंडूंत ७ चौकारांसह ५७ धावा केल्या. धोनीनं शार्दूल ठाकूरच्या हाती चेंडू सोपवला आणि १९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्यानं राशिदला ( १४) बाद केले. मग काय ब्राव्होनं चेन्नईचा विजय पक्का केला. SRHला ८ बाद १४७ धावाच करता आल्या आणि CSKनं २० धावांनी विजय मिळवला. 

या विजयासह IPLमध्ये सर्व प्रतिस्पर्धींविरुद्ध किमान १० विजय मिळवण्याचा मान चेन्नईनं पटकावला. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील पहिला व एकमेव संघ आहे. 

चेन्नई सुपर किंग्सची अन्य संघांविरुद्धची कामगिरी १५ विजय वि. दिल्ली कॅपिटल्स १५ विजय वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू१४ विजय वि. राजस्थान रॉयल्स१३ विजय वि. किंग्स इलेव्हन पंजाब१३ विजय वि. कोलकाता नाईट रायडर्स१२ विजय वि. मुंबई इंडियन्स१० विजय वि. सनरायझर्स हैदराबाद 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीसनरायझर्स हैदराबाद