Join us  

IPL 2020 : RCB च्या परस्पर निर्णयावर कर्णधार विराट कोहली नाराज? युजवेंद्र चहलनंही विचारला सवाल

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाच्या नावात आणि लोगोमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 11:00 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाच्या नावात आणि लोगोमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. RCBनं बुधवारी तसे संकेत दिले. त्यांनी त्यांच्या सोशल अकाऊंट्सवरील प्रोफाईल फोटो हटवले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या नावाऐवजी केवळ रॉयल चॅलेंजर्स असे नाव ठेवले. त्यामुळे RCBच्या मनात नक्की चाललंय का, याचा अंदाज नेटिझन्स घेऊ लागले. पण, हे सर्व करताना RCBनं कर्णधार विराट कोहलीला विश्वासात घेतलं नसल्याचं चित्र आता समोर आलं आहे. विराट कोहलीनं ट्विट करून आपण अनभिज्ञ असल्याचं सांगितलं. त्यावरून कोहली या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

बुधवारी RCBनं त्यांच्या ट्विटर, इस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो म्हणून ठेवलेला लोगो अचानक काढला. शिवाय त्यांनी RCBहे नाव न ठेवता केवळ रॉयल चॅलेंजर्स असंच ठेवल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार RCBत्यांच्या नावात ‘Bangalore’ याऐवजी आता ‘Bengaluru’ असं लिहीणार आहे आणि 16 फेब्रुवारीला याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. आता नावात बदल केल्यानंतर तरी RCBचं नशीब उजळणार का, असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत.

आयपीएलच्या आगामी मोसमाला सुरुवात होण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे RCBत्यांच्या नावत बदल करण्याची शक्यता आहे. यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघानं गतमोसमात संघाचं नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स असं केलं होतं. RCBच्या टायटल स्पॉन्सर्समध्ये Muthoot Corp. चा समावेश झाल्यानं RCB त्या दृष्टीनं काही निर्णय घेणार असल्याचीही चर्चा आहे. 

पण, कोहलीनं यावर ट्विट केलं. तो म्हणाला,''RCBच्या सोशल मीडियावर बदल झाले आणि त्याची पुसटशी कल्पना कर्णधाराला नाही. काही मदत लागल्यास नक्की कळवा.''

युजवेंद्र चहलनंही RCBनं काय गुगली टाकली आहे, असा प्रश्न विचारला.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCBला अजून एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमात कर्णधारपदाची जबाबदारी दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्यात येईल अशीच चर्चा रंगली होती. पण, नवीन नियुक्त करण्यात आलेले क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी ही शक्यता खोडून काढली. कोहलीसह, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल हे ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट संघात असूनही RCBच्या जेतेपदाची पाटी कोरीच राहिली आहे. 

IPL2020 संघानं कायम राखलेले खेळाडू विराट कोहली, मोईन अली, युजवेंद्र चहल, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, मोहम्मद सीराज, पवन नेगी, उमेश यादव, गुरुकीरत मान, देवदत्त पड्डीकल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी

लिलावात ताफ्यात दाखल करून घेतलेले खेळाडूअॅरोन फिंच ( 4.4 कोटी), ख्रिस मॉरिस ( 10 कोटी), जोशूआ फिलीप ( 20 लाख), केन रिचर्डसन ( 4 कोटी), पवन देशपांडे ( 20 लाख), डेल स्टेन ( 2 कोटी), शाहबाझ अहमद ( 20 लाख), इसूरु उदाना ( 50 लाख) 

टॅग्स :आयपीएल 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीयुजवेंद्र चहल