Join us  

IPL 2020 : ...तर याच रणनितीने वाटचाल करण्याचा प्रयत्न; कर्णधार इयॉन मॉर्गननं सांगितला केकेआरचा विनिंग फॉर्म्युला

हैदराबदचा अखेरचा साखळी सामना मुंबई इंडियन्सविरुद्द होणार असून या सामन्यात हैदरबादचा पराभव झाला, तरच कोलकाता प्ले ऑफ प्रवेश करेल. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2020 2:30 PM

Open in App

मुंबई :कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) यंदाच्य Indian Premier League (IPL 2020)मधील प्ले ऑफच्या आपल्या आशा कायम राखताना रविवारी राजस्थान रॉयल्सचा (Rajsathan Royals) एकतर्फी सामन्यात पराभव केला. मात्र असे असले, तरी आता त्यांच्या आशा सनरायझर्स हैदराबादवर अवलंबून आहेत. हैदराबदचा अखेरचा साखळी सामना मुंबई इंडियन्सविरुद्द होणार असून या सामन्यात हैदरबादचा पराभव झाला, तरच कोलकाता प्ले ऑफ प्रवेश करेल. 

राजस्थानविरुद्ध कोलकात्याने जबरदस्त आक्रमक खेळ केला आणि हीच त्यांची रणनिती असल्याचे कर्णधार इयॉन मॉर्गनने (Eion Morgan) स्पष्टही केले. त्यामुळेच जर का कोलकात्याचा प्ले ऑफमध्ये प्रवेश झाला, तर याच रणनितीने वाटचाल करण्याचा कोलकात्याचा प्रयत्न असेल.

सुरुवातीच्या पडझडीनंतरही कोलकात्याने राजस्थानविरुद्ध १९१ धावांची आव्हानात्मक मजल मारली. मॉर्गनने तडाखेबंद नाबाद अर्धशतक झळकावत संघाला आव्हानात्मक मजल मारून दिली. यानंतर राजस्थानला ९ बाद १३१ धावांवर रोखत कोलकाताने शानदार विजय मिळवला.या सामन्यानंतर कर्णधार मॉर्गनने सांगितले की, ‘उभारलेली धावसंख्या नक्कीच आव्हानात्मक होती. बाद होऊन परतलेल्या प्रत्येक फलंदाजाने, खेळपट्टी फलंदाजीस पोषक असल्याचे सांगितले होते. तसेही आम्ही पूर्ण आक्रमक खेळ करण्याच्या इराद्यानेच उतरलो होतो. कारण याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. फलंदाजी करताना आम्ही अधिकाधिक धोका पत्करण्यास तयार होतो.’ दवाचाही फायदा झाल्याचे सांगताना मॉर्गन म्हणाला की, ‘दव अपेक्षेपेक्षा खूप लवकर पडले आणि यामुळे राजस्थानला फायदा झाला नाही.’

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्सआयपीएल