Join us  

Same To Same : संजू सॅमसनच्या अफलातून कॅचनं ताजी केली 1992मधील सचिन तेंडुलकरची आठवण, Video

IPL 2020: कॅच घेतल्यानंतर डोक्यावर पडल्यावर काय वेदना होतात, हे मी जाणतो... 1992च्या वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्ध त्याचा अनुभव मी घेतलाय - सचिन तेंडुलकर

By स्वदेश घाणेकर | Published: October 01, 2020 8:00 AM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्यात KKRने बाजी मारली. शुबमन गिल ( Shubman Gill), इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांच्या दमदार कामगिरीनंतर KKRच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना RRचा विजयरथ अडवला. या सामन्यात संजू सॅमसननं एक अफलातून झेल टिपला. त्याच्या या कॅचनं सचिन तेंडुलकरची ( Sachin Tendulkar) 1992ची वर्ल्ड कपमधील आठवण ताजी केली. 

शिवम मावी ( Shivam Mavi), वरुण चक्रवर्थी ( Varun Chakravarthi) आणि कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) या युवा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. नागरकोटीनं दोन विकेट्ससह दोन झेलही टिपले. दोन महत्त्वाचे फलंदाज बाद करणाऱ्या शिवम मावीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानं गौरविण्यात आलं. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) टिच्चून मारा करताना KKRच्या धावगतीला वेसण घातलं होतं. मात्र, शुबमन गिल ( Shubman Gill) आणि इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांनी फटकेबाजी करून KKR संघाला 6 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. शुबमननं 34 चेंडूंत 47 धावा केल्या. नितिश राणाने 17 चेंडूंत 22 धावा केल्या. मॉर्गननं 23 चेंडूंत नाबाद 34 धावा केल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( RR) 30 धावांत दोन धक्के बसले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 3) आणि संजू सॅमसन ( 8) यांना अनुक्रमे पॅट कमिन्स व शिवम मावी यांनी माघारी पाठवले. जोस बटलर आज फॉर्मात वाटत होता. त्यानं दोन खणखणीत षटकारही खेचले, परंतु सातव्या षटकात शिवम मावीनं त्याला चतुराईनं बाद केलं.  रॉबीन उथप्पाला मोठी खेळी करण्याची संधी होती. पण, तो 2 धावांवर माघारी परतला.  RRने 9 बाद 137 धावा केल्या. KKRनं 37 धावांनी विजय मिळवला. टॉम कुरन 36 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 54 धावा केल्या. 

या सामन्यात संजू सॅमसननं एक अफलातून झेल टिपला. टॉम कुरनच्या गोलंदाजीवर पॅट कमिन्सनं उत्तुंग फटका मारला आणि सॅमसननं हवेत झेपावत तो झेल घेतला. त्यानंतर सॅमसनचं डोकं मैदानावर जोरात आपटले. सॅमसनच्या या कॅचनं सचिन तेंडुलकरनं ( Sachin Tendulkar) 1992 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टिपलेल्या कॅचची आठवण करून दिली. तेंडुलकरनंही सॅमसनच्या या कॅचनंतर ट्विट केलं.  पाहा तो कॅच  

टॅग्स :IPL 2020सचिन तेंडुलकरकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स