Join us  

IPL 2020 Auction: KKRनं वगळलेल्या स्फोटक फलंदाजासाठी कोहली अन् धोनी यांच्यात शर्यत 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो बंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 2:59 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो बंद झाली. प्रत्येक संघांनी रणनीतीनुसार अनेक खेळाडूंना कायम राखले, तर काहींना डच्चू दिले. या रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये काही मोठी नावही आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागलीय ती 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल 2020च्या लिलावाची. आयपीएल ट्रेडमध्ये 11 खेळाडूंची अदलाबदली झाली. यात कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघानं रिलीज केलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लीनचं नाव सध्या जास्त चर्चेत आहे. लीनला डच्चू देण्याचा निर्णयाचा पश्चाताप KKRला होत आहे. कारण, लीननं टी 10 लीगमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आहे आणि त्यानं स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला.

आयपीएलच्या लिलावापूर्वी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( 12), कोलकाता नाइट रायडर्स ( 11), राजस्थान रॉयल्स ( 11), मुंबई इंडियन्स ( 10), दिल्ली कॅपिटल्स ( 9), किंग्ज इलेव्हन पंजाब ( 7), चेन्नई सुपर किंग्स ( 6) आणि सनरायझर्स हैदराबाद ( 5) यांनी एकूण 71 खेळाडूंना रिलीज केलं. KKRनं रिलीज केल्यानंतर लीनची बॅट चांगलीच तळपली आहे. टी 10 लीगमध्ये मराठा अरेबियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लीननं 8 डावांत 236.30 च्या स्ट्राईक रेटनं 371 धावा केल्या. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे 19 डिसेंबरला होणाऱ्या आयपीएल लिलावात लीनसाठी तीन खेळाडूंनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राजस्थान रॉयल्स - राजस्थान रॉयल्स स्फोटक सलामीवीराच्या शोधात आहे. त्यांनी अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्सा दिले. त्यामुळे ते लीनला संघात घेण्यासाठी उत्सुक आहेत. मधल्या फळीत त्यांच्याकडे स्टीव्ह स्मिथ व बेन स्टोक्स हे तगडे फलंदाज आहेत. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - बंगळुरूकडे एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली, मोइन अली यांच्यासारखा तगडा फौजफाटा आहे. पण, तरीही त्यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यांच्याकडेही सलामीवीराची समस्या आहे आणि ती उणीव लीन भरून काढू शकतो. त्यामुळे कोहली व डिव्हिलियर्सवरचा भार थोडा हलका होईल. 

चेन्नई सुपर किंग्स -  चेन्नई सर्वच बाबतीत वरचढ आहे. त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज फॅफ ड्यु प्लेसिस आहे. त्याच्यासाथीला लीन असल्यास चेन्नईला दमदार सुरुवात करता येईल. 

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्स