SRH vs RR Latest News : विजयानंतर राहुल टेवाटियाचा पारा चढला; खलील अहमदसोबत झालं भांडण, Video

Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)  यांच्यातल्या सामन्यात राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि रियान पराग ( Riyan Parag) यांनी अशक्यप्राय विजय मिळवला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 11, 2020 08:23 PM2020-10-11T20:23:07+5:302020-10-11T20:26:59+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Angry Rahul Tewatia clashes with Khaleel Ahmed and David Warner after RR beats SRH, watch Video | SRH vs RR Latest News : विजयानंतर राहुल टेवाटियाचा पारा चढला; खलील अहमदसोबत झालं भांडण, Video

SRH vs RR Latest News : विजयानंतर राहुल टेवाटियाचा पारा चढला; खलील अहमदसोबत झालं भांडण, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)  यांच्यातल्या सामन्यात राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि रियान पराग ( Riyan Parag) यांनी अशक्यप्राय विजय मिळवला. १५८ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचे ( RR) पाच फलंदाज ७८ धावांवर माघारी परतले होते. खलील अहमद ( Khaleel Ahmed) आणि रशीद खाननं ( Rashid Khan) महत्त्वाच्या विकेट्स घेत RRला कोंडीत पकडले होती, परंतु टेवाटिया व परागनं ही कोंडी तोडली अन् RRला विजय मिळवून दिला. या विजयानंतर रियान परागनं ( Riyan Parag) यानं पारंपरिक बिहू नृत्य केले, पण दुसरीकडे टेवाटिया आणि खलील अहमद व डेव्हिड वॉर्नर यांच्यात हमरीतुमरी झालेली पाहायला मिळाली. 

 राजस्थान रॉयल्सचा अविश्वसनीय विजय!; रियान परागचा मैदानावरच भारी डान्स, पाहा फोटो

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर ( ४८) आणि मनीष पांडे ( ५४) यांनी दमदार खेळ केला. अखेरच्या षटकांत हैदराबादनं कमबॅक करताना ४ बाद १५८ समाधानकारक पल्ला गाठला.

टेवाटिया एक क्रांती है, बॉलरो की शांती है!; राजस्थानच्या विजयानंतर वीरूचं भन्नाट ट्विट

प्रत्युत्तरात कर्णधार स्टीव्ह स्मिथनं सलामीला जोस बटलरसह IPL 2020 पहिलाच सामना खेळणाऱ्या बेन स्टोक्सला पाठवलं. स्टोक्सनं पहिल्या षटकात चौकार खेचून आक्रमक पवित्रा असल्याचे दाखवले. पण, पुढच्याच षटकात SRHचा कर्णधार वॉर्नरनं खलील अहमदला गोलंदाजीला आणले आणि त्यानं स्टोक्सला बाद केले. त्यानंतर स्मिथ ( ५, धावबाद) आणि बटलर ( १६) माघारी परतल्यानं राजस्थान अडचणीत सापडले.रॉबिन उथप्पा चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु रशीद खाननं त्याला ( १८) पायचीत केलं. संजू सॅमसनलाही त्यानंच बाद केलं आणि RRचा निम्मा संघ ७८ धावांत माघारी परतला होता.

राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि रियान पराग ( Riyan Parag) यांनी अर्धशतकी भागीदारी करताना RRला शर्यतीत कायम राखले होते.  अखेरच्या १८ चेंडूंत विजयासाठी ३६ धावांची गरज असताना टेवाटियानं रशीद खानच्या एका षटकात १४ धावा चोपल्या. नटराजननं टाकलेल्या १९व्या षटकातही १४ धावा चोपून ६ चेंडूंत ८ धावा असा सामना फिरवला. राहुलनं २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून नाबाद ४५ धावा केल्या, तर परागनं २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह नाबाद ४२ धावा करून RRला पाच विकेट्सनं विजय मिळवून दिला. 

अखेरच्या षटकात खलील आणि टेवाटिया यांच्यात शाब्दिक चकमक झाली. टेवाटियानं SRHच्या गोलंदाजाला डिवचले, परंतु खलीलनं त्याकडे दुर्लक्ष केलं. विजयानंतर टेवाटियाचा पारा अधिक चढला आणि खलीलसोबत त्याचे द्वंद्व सुरू झाले. डेव्हिड वॉर्नरनं टेवाटियाला शांत करण्याचा प्रयत्न केला. 

पाहा नेमकं काय घडलं


Web Title: IPL 2020 : Angry Rahul Tewatia clashes with Khaleel Ahmed and David Warner after RR beats SRH, watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.