Join us  

IPL 2019 : जेव्हा आयपीएलच्या मॅचमध्ये बॉल होतो गायब, पाहा व्हिडीओ

जेव्हा हा गायब झालेला बॉल मिळाला तेव्हा खेळाडूंसहीत पंचांनाही हसू आवरता आले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 6:21 PM

Open in App

बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला. या सामन्यात जेव्हा बंगळुरुचा संघ फलंदाजी करत होता तेव्हा चक्क बॉलच गायब झाल्याचे पाहायला मिळाले. पण जेव्हा हा गायब झालेला बॉल मिळाला तेव्हा खेळाडूंसहीत पंचांनाही हसू आवरता आले नाही.

या सामन्यातील पहिल्या डावात 14 षटकांनंतर टाइम आऊट घेण्यात आला. त्यानंतर जेव्हा गोलंदाज बॉलिंग करण्यासाठी सज्ज झाला तेव्हा त्याच्या हातात चेंडू नव्हता. त्यावेळी पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने पंचांकडे चेंडूची मागणी केली. त्यानंतर चेंडूची शोधाशोध सुरु झाली, पण चेंडू काही मिळाला नाही. त्यानंतर पंचांनी नवीन चेंडू मागवला. त्यानंतर नेमका चेंडू हरवला कुठे, याचा शोध घेण्यासाठी व्हिडीओ पाहायला सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये तो हरवलेला चेंडू सापडला आणि तो चेंडू निघाला मैदानावरील पंचांच्या खिशामध्ये.

पाहा हा व्हिडीओ

कोलहीच्या सेलिब्रेशनवर भडकला अश्विन, पाहा हा व्हिडीओरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सेलिब्रेशन केले आणि त्यावर पंजाबचा कर्णधार आर. अश्विन चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यात आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना अश्विन फलंदाजीला आला होता. त्यावेळी अश्विनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतरच्या चेंडूवरही अश्विनने मोठा फटका मारला. हा फटका षटकार जाईल, असे वाटत होते. पण कोहलीने सीमारेषेवर अश्विनचा झेल पकडला. झेल पकडल्यावर कोहलीने हाताने काही खुणा केल्या. त्यावेळी अश्विन चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. अश्विनने आपले ग्लोव्ज मैदानातून बाहेर निघताना फेकून दिल्याचे पाहायला मिळाले.

पाहा हा व्हिडीओ

आरसीबीला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू आयपीएलला मुकणाररॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने बुधवारी विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. पण या आनंदाच्या क्षणानंतर आरसीबीला एक वाईट बातमी समजली आहे. आरसीबीचा एक स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे आणि यापुढील आयपीएलच्या सामन्यांमध्ये त्याला खेळता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीला चांगली सुरुवात करता आली नाही. आरसीबीला पहिल्या सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर मात्र त्यांनी विजय मिळवले आहेत. आता संघाची गाडी रुळावर येत असताना आरसीबीला मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा एक महत्वाचा खेळाडू जायबंदी झाला आहे.

आरसीबीचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा दुखापतग्रस्त झाला आहे. दुसऱ्या सामन्यानंतर स्टेनच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर स्टेनची वैद्यकीय चाचणी केली आणि ही दुखापत गंभीर असल्याचे समजले. त्यानंतर मात्र स्टेनने विश्वचषकासाठी आयपीएलमधून काढता पाय घेतला आहे. 

एबी डि'व्हिलियर्सची तुफानी खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या गोलंदाजीमुळे बंगळुरुला विजय मिळवता आला. एबी डि'व्हिलियर्सच्या झंझावाती फलंदाजीमुळे आरसीबीला प्रथम फलंदाजी करताना 202 धावा करता आल्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग पंजाबला करता आला नाही. आरसीबीने हा सामना 17 धावांनी जिंकला. आरसीबीने पंजाबवर मात करत विजयी हॅट्रिक साजरी केली.

आरसीबीच्या 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या दोघांनीही आक्रमक सुरुवात केली. पण या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. त्यानंतर लिकोलस पुरन आणि डेव्हिड मिलर यांची जोडी चांगली जमली.एबी डि'व्हिलियर्सच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे 203 धावांचे आव्हान ठेवता आले. डि'व्हिलियर्सने यावेळी 44 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 82 धावा केल्या.

पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांनी आक्रमक सुरुवात केली. पण कोहलीला यावेळी जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. कोहली 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर पटेल आणि डि'व्हिलियर्स यांची चांगलीच जोडी जमली. पण पटेलला अर्धशतक झळकावण्यात अपयश आले. पटेल बाद झाल्यावर आरसीबीची मधली फळी कोसळली. यावेळी डि'व्हिलियर्सने संघाला सावरले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.

टॅग्स :आयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर