Join us  

 IPL 2019 : पीचवर पडूनही रैनाने मारला चौकार

सुरेश रैनाने चक्क पीचवर पडून चौकार मारल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 9:06 PM

Open in App

आयपीएल २०१९ : दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आजच्या सामन्यात एक वेगळाच किस्सा पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी सुरेश रैनाने चक्क पीचवर पडून चौकार मारल्याचे पाहायला मिळाले.

अक्षर पटेलच्या सहाव्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रैना एक फटका मारायला गेला. पण त्यावेळी त्याचा तोल योग्य न राहिल्यामुळे तो पीचवर पडला. पण त्याने जो फटका मारला तो थेट सीमारेषेवर गेला आणि रैनाला चौकार मिळाला.

पाहा हा व्हिडीओ

टॅग्स :सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्स