Join us  

IPL 2019 : दिल्लीच्या संघाबरोबर धवनच्या बायकोने धरला ठेका, व्हिडीओ वायरल

दिल्लीच्या संघातील इशांत शर्मा, पृथ्वी शॉ यांनी चांगलाच ताल धरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 6:09 PM

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल २०१९ : आयपीएलचे सामने एकिकडे होत असताना दुसरीकडे खेळाडू श्रमपरीहार करत असल्याचेही पाहायला मिळते. दिल्ली कॅपिटल्स संघाने मंगळवारी एक पार्टी केली. या पार्टीमध्ये दिल्लीच्या संघातील खेळाडूंबरोबर सलामीवीर शिखर धवनची बायको आएशाने भांगडा केल्याचे पाहायला मिळाले आणि या डान्सचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.

मंगळवारी रात्री दिल्लीच्या संघाने पार्टी केली. यावेळी दिल्लीच्या संघातील इशांत शर्मा, पृथ्वी शॉ यांनी चांगलाच ताल धरला होता. त्यानंतर शिखर धवन आणि त्याची पत्नी आएशादेखील यांनी भांगडा केल्याचे पाहायला मिळाले.

हा पाहा खास व्हिडीओ

 

दिल्लीची भेदक गोलंदाजी, हैदराबादवर विजयी स्वारी

किमो पॉल आणि कागिसो रबाडा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनेसनरायझर्स हैदराबादलापराभूत केले. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावा करता आल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग हैदराबादच्या संघाला करता आला नाही. या सामन्यात दिल्लीने हैदराबाद़वर ३९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.

दिल्लीच्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदकबादाच्या जॉनी बेअस्टोव आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार सलामी दिली. या दोघांनी १० षटकांत ७२ धावांच सलामी दिली. पण संघाच्या ७२ धावा असताना जॉनी बाद झाला. जॉनीने ३१ चेंडूंत ४१ धावा केल्या. जॉनी बाद झाल्यावर वॉर्नरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वॉर्नरने आपले अर्धशतक झळकावले खरे, पण त्यानंतरच्याच चेंडूवर तो बाद झाला. वॉर्नरला 51 धावा करता आल्या. वॉर्नर बाद झाल्यावर हैदराबादचा डाव कोसळायला सुरुवात झाली.

यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळणाऱ्या खलील अहमदने भेदक मारा करत दिल्ली कॅपिटल्सच्या धावांना वेसण घातली. भेदक गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्सच्या हैदराबादने दिल्लीच्या संघाला 155 धावांवर रोखले.

हैदराबादने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. हैदराबादच्या संघात पुनरागमन करणाऱ्या खलील अहमदने सुरुवातीला भेदक मारा केला. खलीलने पृथ्वी शॉ आणि त्यानंतर शिखर धवन या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले असले तरी या सामन्यात प्रथमच यंदाच्या हंगामात खेळणाऱ्या कॉलिन मुर्नोने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मुर्नोने २४ चेंडूंत ४० धावांची दमदार खेळी साकारली. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या हैदराबादच्या अभिषेक शर्माने बाद केले.

मुर्नो बाद झाल्यावर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी संयतपणे फलंदाजी केली. पण भुवनेश्वर कुमारने श्रेयसला बाद करत ही जोडी फोडली. श्रेयसला ४० चेंडूंत ४५ धावा करता आल्या. श्रेयस पाठोपाठ पंतही बाद झाला. खलीलने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. पंतने १९ चेंडूंत २३ धावा केल्या.

 

टॅग्स :शिखर धवनदिल्ली कॅपिटल्सआयपीएल 2019