IPL 2019: पाहा धोनी इफेक्ट, जेव्हा बेल्सलाही वाटते 'माही'ने खेळावे

पाचव्या षटकातील चौथा चेंडू यष्ट्यांना लागला होता. पण धोनी आऊट मात्र झाला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 09:13 PM2019-03-31T21:13:16+5:302019-03-31T21:13:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: See the Dhoni effect, when Bells also think 'Mahi' should play | IPL 2019: पाहा धोनी इफेक्ट, जेव्हा बेल्सलाही वाटते 'माही'ने खेळावे

IPL 2019: पाहा धोनी इफेक्ट, जेव्हा बेल्सलाही वाटते 'माही'ने खेळावे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, आयपीएल २०१९ : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईची सुरुवात चांगली झाली नव्हती. चेन्नईने आपले पहिले तिन्ही फलंदाज २७ धावांमध्ये गमावले होते. त्यानंतर धोनी खेळायला आला. धोनीला बाद करण्याचे राजस्थानने बरेच प्रयत्न केले. पण स्टम्पच्या बेल्सला ते मान्य नसल्याचे पाहायला मिळाले. 

हा प्रकार घडला तो पाचव्या षटकात. पाचवे षटक जेफ्रो आर्चर टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूचा सामना धोनी करत होता. धोनीचा हा सामन्यातील दुसराच चेंडू होता आणि त्याने अजून आपले खातेही उघडले नव्हते. त्यावेळी हा पाचव्या षटकातील चौथा चेंडू यष्ट्यांना लागला होता. पण धोनी आऊट मात्र झाला नाही. कारण त्यावेळी स्टम्पवरील बेल्स पडली नाही आणि धोनी नाबाद राहिला.

हा पाहा खास व्हिडीओ


Web Title: IPL 2019: See the Dhoni effect, when Bells also think 'Mahi' should play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.