Join us  

IPL 2019 RR vs KKR live update : कोलकात्याचा राजस्थानवर सहज विजय

जयपूर, आयपीएल 2019 : कोलकात्याने राजस्थानच्या 140 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. कोलकाताचा सलामीवीर सुनील नरिनला 23 धावांवर असताना ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 7:24 PM

Open in App

11:03 PM

कोलकात्याचा राजस्थानवर सहज विजय

भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनेराजस्थान रॉयल्सवर सहज विजय मिळवला. स्टीव्हन स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 139 धावा केल्या होत्या. कोलकात्याने राजस्थानवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. सामना सुरु होण्यापूर्वी स्टेडियममध्ये वाळूचे वादळ आले होते. त्यानंतर कोलकात्याच्या वादळापुढे राजस्थानचा संघ बेचिराख झाल्याचे पाहायला मिळाले.

10:40 PM

कोलकात्याला दुसरा धक्का

ख्रिस लिनच्या रुपात कोलकात्याला धक्का बसला. अर्धशतक झळकावल्यावर लिन दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. लिनने 32 चेंडूंत 50 धावा केल्या.

10:38 PM

लिनचे शतक

ख्रिस लिनने 31 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.

10:29 PM

कोलकात्याला पहिला धक्का

सुनील नरिनच्या रुपात कोलकात्याला पहिला धक्का बसला. नरिनने 25 चेंडूंत 47 धावा केल्या, यामध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.

10:02 PM

सुनील नरिनला जीवदान

कोलकाताचा सलामीवीर सुनील नरिनला 23 धावांवर असताना जीवदान मिळाले. धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीने नरिनला जीवदान दिले.

09:36 PM

स्मिथचे अर्धशतक, राजस्थानच्या 139 धावा

स्टीव्हन स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयटल्सला प्रथम फलंदाजी करताना 139 धावा केल्या. स्मिथने यावेळी 59 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 73 धावा केल्या.

09:20 PM

राहुल त्रिपाठी आऊट

राहुल त्रिपाठीच्या रुपात राजस्थानला तिसरा धक्का बसला. त्रिपाठी सहा धावांवर आऊट झाला.

09:16 PM

स्मिथचे अर्धशतक

यंदाच्या हंगामातील स्थिमचे हे पहिले शतक ठरले. स्मिथने 44 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

08:52 PM

राजस्थानला दुसरा धक्का

बटलरच्या रुपात राजस्थानला दुसरा धक्का बसला. बटलरला 34 चेंडूंत 37 धावा करता आल्या.

08:39 PM

राजस्थानचे अर्धशतक पूर्ण

स्टीव्हन स्मिथच्या चौकाराच्या जोरावर राजस्थानने नवव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केेले.

08:23 PM

राजस्थान 5 षटकांत 1 बाद 25

अजिंक्य रहाणेला गमावल्यावर राजस्थानची सुरुवात संथ झाली. यावेळी राजस्थानला पाच षटकांमध्ये 25 धावा करता आल्या.

08:14 PM

राजस्थानला मोठा धक्का, रहाणे तंबूत

कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रुपात राजस्थानला मोठा धक्का बसला. यावेळी अजिंक्यला पाच धावा करता आल्या.

07:58 PM

... असे आहेत दोन्ही संघ



 

07:51 PM

एक 'रॉयल' हरली, दुसरे रॉयल्स जिंकणार का

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. पण दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स जिंकणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दोन्ही संघांना प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. पण बंगळउरु पराभूत झाली. दुसरीकडे रॉयल्स हा सामना जिंकणार की रविवार रॉयल आणि रॉयल्सला पराभव दाखवणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

07:33 PM

कोलकाताने नाणेफेक जिंकली

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकत कोलकाताने राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्सआयपीएल 2019