Join us  

Ipl 2019 RCB vs RR: राजस्थानचा बंगळुरुवर सात विकेट्स राखून विजय

जयपूर, आयपीएल २०१९ : राजस्थान रॉयल्सने  आपल्या चौथ्या सामन्यात अखेर पहिल विजय मिळवला. भेदक गोलंदाजी आणि  जोस बटलरच्या  दमदार ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 7:27 PM

Open in App

11:24 PM

राजस्थानला तिसरा धक्का

स्टीव्हन स्मिथच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. स्मिथने ३८ धावा केल्या.

09:36 PM

बंगळुरुचे राजस्थानपुढे १५९ धावांचे आव्हान

अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या दमदार फटकेबाजीमुळे बंगळुरुला १५८ धावा करता आल्या. बंगळुरुच्या धावसंख्येमध्ये महत्वाचे योगदान राहीले ते पार्थिव पटेलचे.

11:18 PM

राजस्थानचे दीडशतक

राजस्थानने अठराव्या षटकात आपले दीडशतक पूर्ण केले.

10:53 PM

राजस्थानला दुसरा धक्का

जोस बटलरच्या रुपात राजस्थानला दुसरा धक्का बसला. बटलरने ४३ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या.

10:45 PM

चौकारासर बटलरचे शतक

बटलरने चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. या मैदानातील बटलरचे हे चौथे अर्धशतक ठरले.

10:34 PM

अजिंक्य रहाणे आऊट

अजिंक्यच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. अजिंक्यने २० चेंडूंत २२ धावा केल्या.

10:14 PM

राजस्थान ५ षटकांत बिनबाद ४६

राजस्थानच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली. त्यामुळे राजस्थानला पाच षटकांमध्ये एकही फलंदाज न गमावता ४६ धावा करता आल्या.

10:01 PM

कोहलीने सोडला रहाणेचा झेल

राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे फक्त एका धावेवर असताना त्याला बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने जीवदान दिले. 

09:22 PM

पटेलची झुंजार खेळी संपुष्टात

पार्थिव पटेलने ४१ चेंडूंत ६७ धावांची दमदार खेळी साकारली.

09:09 PM

पार्थिवचे दमदार अर्धशतक

महत्वाचे फलंदाज बाद झाल्यावर बंगळुरुचा डाव पार्थिव पटेलने सावरला. पटेलने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

08:46 PM

शिमरॉन हेटमायर बाद, गोपालची तिसरी विकेट



 

08:36 PM

विराटपाठोपाठ डिव्हिलियर्सही बाद, बंगळुरूला दुसरा धक्का



 

08:25 PM

कोहली आऊट, बंगळुरुला मोठा धक्का

विराट कोहलीच्या रुपात बंगळुरुला पहिला धक्का बसला. कोहलीने २५ चेंडूंत २३ धावा केल्या.

08:24 PM

बंगळुरुची दमदार सुरुवात

बंगळुरुने राजस्थानविरुद्ध दमदार सुरुवात केली. बंगळुरुने पहिल्या सहा षटकांमध्ये एकही फलंदाज न गमावता ४८ धावा केल्या.

07:58 PM

कोहली शंभराव्यांदा बंगळुरुचे नेतृत्व करणार

आजच्या सामन्यात विराट कोहली शंभराव्यांदा बंगळुरुचे नेतृत्व करणार आहे.

07:39 PM

राजस्थानने नाणेफेक जिंकली

राजस्थानने नाणेफेक जिंकत बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

07:32 PM

पहिला विजय कोणाचा ठरणार...

बंगळुरु आणि राजस्थान या दोन्ही संघांना आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. जो संघ आज सामना जिंकेल त्यांचा हा पहिला विजय ठरेल.

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूअजिंक्य रहाणेराजस्थान रॉयल्स