Join us  

IPL 2019 : 'पिझ्झा बॉय'ने थांबवला हैदराबाद-राजस्थान सामना, पाहा कसा!

IPL 2019: सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या 12 व्या हंगामात पहिल्या विजयाची चव चाखली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 12:16 PM

Open in App

हैदराबाद, आयपीएल २०१९: सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या 12 व्या हंगामात पहिल्या विजयाची चव चाखली. डेव्हिड वॉर्नर ( 69) आणि जॉनी बेअरस्टो ( 45) यांनी रचलेल्या मजबूत पायामुळे हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर  विजय मिळवला. विजयाच्या उंबराठ्यावर असताना हैदराबादला तीन धक्के बसले, परंतु त्यांनी राजस्थानवर मात करण्यात यश मिळवले. हैदराबादने हा सामना 5 विकेट राखून जिंकला. हैदराबादच्या या विजयामुळे राजस्थानच्या संजू सॅमसनची ( 102) शतकी खेळी व्यर्थ ठरली. पण, मैदानावरील या नाट्यमय घडामोडींत 'पिझ्झा बॉय'ने व्यत्यय आणल्याची घटना शुक्रवारी घडली. 

अजिंक्य रहाणे व संजू सॅमसन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थानने हैदराबादविरुद्ध 198 धावा चोपल्या. रहाणे व सॅमस या दोघांनी वैयक्तीक अर्धशतक झळकावले. रहाणे 70 धावांवर माघारी परतला, तर सॅमसनने नाबाद 102 धावा चोपताना चौकार-षटकारांची आतषबाजी केली. सॅमसनने 55 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकार खेचले. रहाणेने 49 चेंडूंत 70 धावा केल्या आणि त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. राजस्थानच्या डावातील 12 व्या षटकार पिझ्झा बॉयमुळे सामना थांबवण्यात आला. विजय शंकरने टाकलेल्या 12व्या षटकाच्या 5व्या चेंडूवर सॅमसन स्ट्राईकवर होता. त्यावेळी सॅमसनच्या बरोबर समोरच्या प्रेक्षकांमध्ये पिझ्झा बॉय फिरत होता, त्यामुळे सॅमसनने खेळण्यास नकार दिला आणि काही काळ सामना थांबला होता. 

 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने पहिल्या षटकापासूनच राजस्थानच्या गोलंदाजांवर प्रहार केला. पॉवर प्लेमध्ये हैदराबाद संघाने एकही विकेट न गमावता 69 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 27 चेंडूंत 52 धावा, तर जॉनी बेअरस्टोने 9 चेंडूंत 16 धावा केल्या. 10 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वॉर्नर बाद झाला. बेन स्टोक्सने 37 चेंडूंत 69 धावा करणाऱ्या वॉर्नरला धवल कुलकर्णीकरवी झेलबाद केले. वॉर्नरने 9 चौकार व 2 षटकार खेचले. पुढच्याच चेंडूवर धवलने बेअरस्टोचा सोपा झेल सोडला. परंतु, त्याची भरपाई पुढच्याच षटकात त्यानं केली, त्यानं अशक्यप्राय झेल घेत बेअरस्टोवला 48 धावांवर माघारी पाठवले.  बेअरस्टोने 28 चेंडूंत 1 षटकार व 6 चौकार लगावत 48 धावा केल्या. त्यानंतर श्रेयस गोपाळेने हैदराबादच्या दोन फलंदाजांना बाद करून सामन्यात चुरस निर्माण केली, परंतु विजय शंकरने 15 चेंडूंत 35 धावा चोपल्या. युसूफ पठाण ( 16) आणि रशीद खान ( 15) यांनीही नाबाद खेळी करताना हैदराबादचा विजय पक्का केला. 

पाहा व्हिडीओ...

https://www.iplt20.com/video/156719/when-pizza-delivery-boy-halted-play?tagNames=indian-premier-league&fbclid=IwAR3qb53TqkcWAr0WnbLVf20zmT9uRbfupO9kJjML81-XCC0cI8oAHlySMeI

टॅग्स :आयपीएल 2019सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सआयपीएल