Join us  

IPL 2019 : चेन्नईच्या कर्णधारपदी धोनी नाही तर सुरेश रैना

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात टॉस उडवण्यासाठी धोनी आला नाही आणि साऱ्यांनाच धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 7:39 PM

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल २०१९ : चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी महेंद्रसिंग धोनी आहे, हे साऱ्यांनाच परिचित असेल. पण आजच्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात टॉस उडवण्यासाठी धोनी आला नाही आणि साऱ्यांनाच धक्का बसला. धोनीच्या जागी यावेळी सुरेश रैना टॉस उडवण्यासाठी आला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईच्या संघाचे नेतृत्व रैनाकडे सोपवण्यात आले आहे.

पाहा हा व्हीडीओ

 

 

चेन्नईला रोखण्याचे हैदराबादपुढे आव्हान

 विश्वचषक संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला अंबाती रायुडू आपल्या बॅटने उत्तर देण्यास प्रयत्नशील असून शानदार फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपरकिंग्स संघ बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. अशा स्थितीत रायुडू विश्वचषक संघातून बाहेर असणे एकमेव निराशेचे कारण आहे.हैदराबादच्या या फलंदाजाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतकी खेळी करीत फॉर्म मिळवला होता. एकवेळ चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीसाठी सर्वोत्तम पर्याय मानल्या जाणारा रायुडू संघात स्थान न मिळाल्याचा राग सनरायजर्सवर काढण्यासाठी सज्ज असेल. चेन्नई संघ ८ सामन्यात १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर सलग तीन सामने गमाविणारा सनरायजर्स संघाचे मनोधैर्य ढासळलेले आहे. गेल्या लढतीत त्यांना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.

‘वयस्कर सेना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई संघाची ताकद त्यांच्याकडे संघ संयोजनामध्ये असलेली विविधता आहे. परिस्थितीनुसार त्यांच्याकडे प्लॉन ‘अ’,‘ब’ आणि ‘क’ आहे, पण सनरायझर्स सलामीवीर जॉनी बेयरस्टॉ व डेव्हिड वॉर्नर अपयशी ठरल्यानंतर दडपणाखाली येतो. वॉर्नर ४०० आणि बेयरस्टॉच्या ३०४ धावांनंतर तिसºया क्रमांकावर विश्वचषक संघात स्थान मिळवणारा विजय शंकर (१३२ धावा) आहे. सनरायझर्सची अडचण त्यांची मधली फळी आहे. मनीष पांडे (सहा सामन्यांत ५४ धावा), दीपक हुड्डा (४७) आणि युसूफ पठाण (३२) यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पठाण बºयाच दिवसांपासून गतकामगिरीच्या आधारावर संघात आहे, पण त्याला प्रदीर्घ कालावधीपासून चांगली खेळी करता आलेली नाही.दुसºया बाजूचा विचार करता धोनी वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या संयोजनाचा वापर केला आहे. या संघाने कर्णधाराचा विश्वासही सार्थ ठरविला आहे.

टॅग्स :सुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स