Join us  

IPL 2019 : विमानाच्या प्रतीक्षेत चक्क जमिनीवर झोपले धोनी-साक्षी; कॅप्टन कूलनेच घेतली फिरकी

IPL 2019: व्यग्र वेळापत्रकामुळे सहभागी संघातील बऱ्याच खेळाडूंना पुरेशी विश्रांती करण्याची वेळही मिळत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 10:47 AM

Open in App

चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) व्यग्र वेळापत्रकामुळे सहभागी संघातील बऱ्याच खेळाडूंना पुरेशी विश्रांती करण्याची वेळही मिळत नाही. एक सामना झाला की लगेच पुढील लढतीसाठी दुसऱ्या शहराच्या प्रवासाला सुरुवात करावी लागते. त्यामुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावर थकवा जाणवतो. विश्रांतीसाठी त्यांना फावल्या वेळेचा पुरेपूर वापर करावा लागतो. अशाच वेळेचा सदुपयोग धोनीही करताना दिसत आहे. चेन्नईतील सामन्यानंतर धोनीचा संघ गुरुवारी राजस्थान रॉयल्सचा सामना करणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईचा संघ पहाटेच्या विमानानं राजस्थानसाठी रवाना झाला. अपूरी झोप पूर्ण करण्यासाठी धोनी चक्क विमानतळावरच आडवा झाला.चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी घरच्या प्रेक्षकांसमोर आयपीएल लढतीत कोलकाता नाइट रायडर्सवर 7 विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने ( 10 गुण) गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पाहुण्या कोलकाता नाइट रायडर्सला 20 षटकांत 9 बाद 108 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. कोलकाताचे सहा फलंदाज अवघ्या 47 धावांवर माघारी परतले होते. आंद्रे रसेलने 44 चेंडूंत नाबाद 50 धावा करताना कोलकाताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. चेन्नईने हे लक्ष्य 17.2 षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. फॅफ ड्यू प्लेसिस ( 43*) आणि अंबाती रायुडू ( 21) यांनी चेन्नईचा विजय निश्चित केला.

31 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत चेन्नई सुपर किंग्सने चार सामने खेळले. त्यातील एक सामना मुंबईत झाला, तर उर्वरीत चेन्नईत झाले. एका दिवसांच्या विश्रांतीनंतर चेन्नईला गुरुवारी राजस्थानचा सामना करायचा आहे. वारंवारच्या या प्रवासामुळे खेळाडूंना पुरेशी झोपही मिळत नाही. त्यामुळे विमानतळावर त्यांना झोप काढावी लागत आहे. धोनीनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोतून हे चित्र समोर आले आहे.  सलग चौथा विजय, तरीही महेंद्रसिंग धोनी संतापला; जाणून घ्या कारणतो म्हणाला,''या खेळपट्टीवर खेळायला हवे, असे मला वाटत नाही. अशा खेळपट्टींमुळे सामन्यात मोठ्या धावसंख्या होत नाहीत. आमच्या फलंदाजांनाही येथे खेळताना अडचण जाणवली. ड्वेव ब्राव्हो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत फलंदाजीची क्रमवारी ठरवणे आम्हालाही अवघड गेले. आयपीएलमध्ये अशा खेळपट्टी असता कामा नये, परंतु नशिबाने आम्हाला विजय मिळवता आला.'' 

टॅग्स :आयपीएल 2019महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स