IPL 2019 : चेन्नईपुढे कोलकात्याचे लोटांगण

कोलकात्याचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा अर्धा संघ ४४ धावांवर माघारी परतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 09:27 PM2019-04-09T21:27:19+5:302019-04-09T21:43:02+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Kolkata Knight Riders given 109 runs target to Chennai Super Kings |  IPL 2019 : चेन्नईपुढे कोलकात्याचे लोटांगण

 IPL 2019 : चेन्नईपुढे कोलकात्याचे लोटांगण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्सच्या भेदक गोलंदाजीपुढे कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना लोटांगण घालावे लागले. यामध्ये अपवाद ठरला तो आंद्रे रसेल. कारण सरेलने ४४ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ५० धावांची खेळी साकारल्यामुळेच कोलकात्याला प्रथम फलंदाजी करताना 108 धावा करता आल्या. दीपक चहारने भेदक मारा करत तीन बळी मिळवले, तर इम्रान ताहिर आणि हरभजन सिंग यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.



 

चेन्नईने नाणेफेक जिंकून कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सुनील नरिनच्या रुपात कोलकात्याला मोठा धक्का बसला. नरिनला यावेळी सहा धावा करता आल्या. त्यानंतर नितीश राणा शून्यावर बाद झाला. त्यानंतर ठराविक फरकाने कोलकात्याचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा अर्धा संघ ४४ धावांवर माघारी परतला.

Web Title: IPL 2019: Kolkata Knight Riders given 109 runs target to Chennai Super Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.