Join us  

IPL 2019 KKR vs CSK: चेन्नईचा 'सुपर' विजय, कोलकातावर मात

कोलकाता, आयपीएल 2019 : इम्रान ताहीरच्या फिरकी गोलंदाजीनंतर सुरेश रैनाने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने रविवारी इडन ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 3:17 PM

Open in App

07:53 PM

IPL 2019 KKR vsCSK : कोलकाताचीपराभवाचीहॅटट्रिक, चेन्नईप्लेऑफच्याउंबरठ्यावरhttps://t.co/0b1J8liiRn@ChennaiIPL@KKRiders@IPL#KKRvCSK

— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) April 14, 2019  

07:32 PM



 

07:27 PM

या कामगिरीसह रैनाने विराट कोहली व गौतम गंभीर यांच्याशी बरोबरी केली. या दोघांच्या नावावर 36 अर्धशतकं आहेत. डेव्हिड वॉर्नर 39 अर्धशतकांसह आघाडीवर आहे.   
 

07:25 PM

 रैनाने 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे 36वे अर्धशतक ठरले. 


 

07:20 PM

सुनील नरीनने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पायचीत केले. धोनीने 16 धावा केल्या. 

07:09 PM

चेन्नईने 14 षटकांत 4 बाद 109 धावा केल्या. 



 

06:55 PM

चावलाने पुढच्याच षटकात चेन्नईच्या केदार जाधवला ( 20) पायचीत केले. 

06:48 PM

त्यानंतर रैना व अंबाती रायुडू यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु पियूष चावलाने ही जोडी फोडली. चावलाने रायुडूला ( 5) बाद केले. 



 

06:46 PM

फॅफला बाद करून सुनील नरीनने इडन गार्डन्सवर विक्रमाची नोंद केली. इडन गार्डनवर 50 विकेटचा विक्रम त्याने केला

06:28 PM

सहाव्या षटकात चेन्नईचा सेट फलंदाज ड्यू प्लेसिस बाद झाला. सुनील नरीनने त्याला 24 धावांवर माघारी पाठवले.



 

06:27 PM

कोलकाताविरुद्धसुरेशरैनाचाविक्रम, वॉर्नरलाटाकलेमागेhttps://t.co/z2jL9ek1na@KKRiders@ChennaiIPL#KKRvCSKpic.twitter.com/ZILBhk25d7

— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) April 14, 2019  

06:21 PM

त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाने सहावी धाव घेताच विक्रमाची नोंद केली. कोलकाता विरुद्ध सर्वाधिक 765 धावा करण्याचा विक्रम त्याने केला. रैनाने सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरचा 762 धावांचा विक्रम मोडला. या क्रमवारीत मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा ( 757) धावांवर आहे. 

06:17 PM

ख्रिस लीनची फटकेबाजी पाहा



 

06:14 PM

चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हॅरी गर्नेयने चेन्नईचा सलामीवीर शेन वॉटसनला ( 6) बाद केले.



 

06:11 PM

आंद्रे रसेलने टाकलेल्या तिसऱ्या षटकात फॅफ ड्यू प्लेसिसने सलग चार चौकार. चेन्नईने 3 षटकांत 29 धावा केल्या.



 

06:02 PM

06:01 PM

05:31 PM



 

05:23 PM

इम्रान ताहीरने दोन षटकांत प्रत्येकी दोन विकेट घेताना कोलकाता नाइट रायडर्सला मोठा धक्का दिला. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने सामन्यात कमबॅक केले. 15व्या षटकात ताहीरने ख्रिस लीन आणि आंद्रे रसेल या स्फोटक फलंदाजांना माघारी पाठवले. पण, हे षटक टाकण्यापूर्वी ताहीरने कॅप्टन महेंद्रसिंग धोनीशी चर्चा केली होती. धोनीच्या विश्वासावर खरे उतरताना ताहीरने चेन्नईला यश मिळवून दिले. ताहीरने चार षटकांत 27 धावा देत 4 विकेट घेतल्या.

05:15 PM



 

05:14 PM

ताहीरने कोलकाताला आणखी एक धक्का दिला. वादळी खेळी करण्यात तरबेज असलेल्या आंद्रे रसेलला त्याने बाद केले. रसेलला केवळ 10 धावा करता आल्या. 

05:11 PM

लीनचा हा झंझावात ताहीरने रोखला. 15व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ताहीरने शार्दूल ठाकूरकरवी लीनला झेलबाद केले. लीनने 51 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकार खेचून 82 धावा केल्या. 


 

05:05 PM

लीनच्या बॅटीतून धावांचा पाऊस सुरूच राहिला. त्याने संघाला नऊच्या सरासरीने धावा करून दिल्या. रवींद्र जडेजाच्या एकाच षटकात लीनने सलग तीन षटकार खेचले आणि संघाला शंभरी पार करून दिली. 
 

04:51 PM

04:51 PM

त्यानंतर आलेला रॉबीन उथप्पाही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यावेळेही फॅफ ड्यू प्लेसिसने उथप्पाचा झेल टिपला. 

04:48 PM



 

04:48 PM

नितीश राणा 11व्या षटकात तंबूत परतला, त्याला इम्रान ताहीरने बाद केले. राणाने 18 चेंडूंत तीन चौकारांसह 21 धावा केल्या.
 

04:42 PM

लीनने फटकेबाजी करताना 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

04:34 PM

महेंद्रसिंग धोनीसाठी त्याने देशाची सीमा ओलांडली...

बांगलादेशमधील क्रिकेटप्रेमी रविवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात धोनीला पाहण्यासाठी इडन गार्डन्सवर आला होता. 

04:30 PM

कोलकाताला पॉवर प्लेमध्ये 1 बाद 49 धावा करता आल्या. त्यात लीनच्या 38 धावा होत्या.

04:26 PM



 

04:25 PM

लीनने चेन्नईचा गोलंदाज दीपक चहरच्या दोन षटकांत 22 धावा चोपल्या. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मिचेल सँटनरला गोलंदाजीला आणले. आयपीएलच्या या सत्रात प्रथमच चहरला सलग तीन षटके टाकता आली नाही. सँटनरने कोलकाताच्या सुनील नरीनला बाद करून चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. नरीन 2 धावांवर माघारी परतला. 
 

04:13 PM

ख्रिस लीनने कोलकाता नाइट रायडर्सकडून 1000 धावा करण्याचा विक्रम केला.



 

03:56 PM

03:39 PM

नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूने



 

03:38 PM

चेन्नई सुपर किंग्सः शेन वॉटसन, फॅफ ड्यु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, इम्रान ताहीर

03:37 PM

कोलकाता नाइट रायडर्सः ख्रिल लीन, सुनील नरीन, रॉबीन उथप्पा, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, शुबमन गिल, पियुष चावला, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, हॅरी गर्नेय
 

03:33 PM

कोलकाताच्या संघात तीन बदल



 

03:21 PM

सध्याच्या घडीला रसेल हा मनगटाच्या दुखापतीने हैराण आहे. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच रसेलला आगामी सामन्यांमध्ये विश्रांती मिळू शकते, असे म्हटले जात आहे

03:20 PM

कोलकात्याच्या यापूर्वी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रसेलला मैदानात दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले होते. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मोठा फटका मारताना रसेलला स्नायूंची दुखापत झाली होती. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या रसेलचे स्नायू दुखावले होते. त्यानंतर कोलकात्याच्या डॉक्टरांनी मैदानात धाव घेतली होती. रसेलवर त्यावेळी मैदानातच उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याने फलंदाजीही केली होती. त्यानंतर दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही रसेलला दुखापत झाली होती.

03:18 PM

आयपीएलमध्ये हे दोन संघ 19 वेळा समोरासमोर आले आहेत. त्यात कोलकाताने 7, तर चेन्नईने 12 विजय मिळवले आहेत  



 

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स