Join us  

IPL 2019: वृद्धापकाळी आठवतील ते ‘मंतरलेले दिवस’- डिव्हिलियर्स

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेले अनेक चुरशीचे सामने डोळ्यापुढे येतील, तेव्हा तो माझ्या आयुष्यातील किती सर्वोत्कृष्ट काळ होता, याची महती पटणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 3:03 AM

Open in App

एबी डिव्हिलियर्स लिहितात...जेव्हा वृद्धापकाळ येईल, तेव्हा आठवणींना उजाळा देण्यासाठी अनेक किस्से पुढे येतील. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेले अनेक चुरशीचे सामने डोळ्यापुढे येतील, तेव्हा तो माझ्या आयुष्यातील किती सर्वोत्कृष्ट काळ होता, याची महती पटणार आहे. बुधवारी बेंगळुरु येथे पंजाबविरुद्ध सामन्यात आरसीबीचा खेळाडूू होणे माझ्यासाठी सन्माननीय ठरले. स्पर्धेत कायम राहण्यासाठी आमचा संघर्ष सुरू असताना लाल ध्वज फडकविणाऱ्या हजारो चाहत्यांच्या साक्षीने पंजाबवर विजय साजरा करणे शानदार ठरले.कुणी म्हणाले, आम्ही गुणतालिकेततळाच्या स्थानाला आहोत. आम्ही मात्र गुणतालिकेकडे लक्ष देणे फार पूर्वी सोडून दिले होते. त्याऐवजी कडवा सराव, स्पर्धात्मक खेळ, खेळाचा आनंद लुटणे आणि पुढील सामना जिंकणे या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले होते. बुधवारी झोपून उठलो तेव्हा बरे वाटत नव्हते. आम्ही पंजाबविरुद्ध सामन्याची तयारी करीत असताना अनेक सहकाऱ्यांनी,‘ बरा आहेस का’, अशी विचारणा देखील केली. आम्ही पुन्हा एकदा नाणेफेक गमविल्यानंतर चौथ्या षटकातच माझ्यावर फलंदाजी करण्याची वेळ आली. त्यावेळी देखील बरे वाटत नव्हते. पण असे होत राहते. सुरुवातीच्या दहा चेंडूत मी क्रिझवर स्थिरावण्याचा प्रयत्न केला. १४ व्या षटकापर्यंत २५ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. खरेतर फलंदाजी करणे सोपे नव्हते. रविचंद्रन अश्विनच्या भेदक माºयापुढे उभे राहण्याचे आव्हान होते. जे पाहात होते, त्यांनी मी फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे वक्तव्य केले असावे. बुधवारपूर्वीच्या सामन्यापर्यंत मी वेगवान गोलंदाजांविरुद्ध १८५ च्या सरासरीने या सत्रात २९४ धावा केल्या असून फिरकी गोलंदाजीविरुद्ध ११६ च्या सरासरीने १०३ धावा काढण्यात यशस्वी ठरलो होतो. सातपैकी पाचवेळा फिरकी गोलंदाजांनीच मला बाद केले. फिरकीपटूंना प्रत्येकी ३५ व्या चेंडूवर, तर वेगवान गोलंदाजांना प्रत्येक सातव्या चेंडूवर मी षटकार मारला होता. आकडेवारी खोटी नसते, असे अनेकांचे मत आहे. पण आकडेवारी यामागील कारण मात्र समजवू शकत नाही. टी२० क्रिकेटमध्ये मी साधारणपणे तिसºया, चौथ्या किंवा पाचव्या स्थानी खेळतो. याचा अर्थ मी चौथ्या ते दहाव्या षटकापर्यंत मैदानावर येतो. त्यावेळी फिरकीपटूंच्या हातात चेंडू गेलेला असतो. अशावेळी अखेरच्या काही षटकात वेगवान गोलंदाज चेंडूचा ताबा घेतात त्यावेळी माझ्याकडे मोठी फटकेबाजी करण्याची संधीउपलब्ध असते. वेगवान आणि फिरकी माºयापुढे माझ्या कामगिरीचे मूल्यमापन मी कुठल्या स्थानावर खेळतो यावर अवलंबून असते. आरसीबी विजयाचा मार्ग प्रशस्त करीत असताना यापैकी एकाही गोष्टीला अर्थ उरत नाही. आता पुढील लढत दिल्लीविरुद्ध रविवारी असेल. या सामन्याची आम्हाला प्रतीक्षा राहील.

टॅग्स :आयपीएल 2019एबी डिव्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू