Join us  

IPL 2019 : फॅन असावा तर असा; धोनीसाठी आपल्या बायकोलाही सोडायला तयार झाला चाहता

एका सामन्यामध्ये धोनीसाठी एका चाहत्याने चक्क आपल्याना बायकोलाही सोडायचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 5:45 PM

Open in App

मुंबई, आयपीएल २०१९ : महेंद्रसिंग धोनी एका चाणाक्ष कर्णधार आणि निष्णात यष्टीरक्षक आहे. आपल्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्यांदा देण्यात धोनीली काहीही वाटत नाही. अशीच एक गोष्ट धोनीच्या बाबतीत पाहायला मिळाली. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धचा सामना झाल्यावर धोनीने युवा यष्टीरक्षकांना शिकवणी दिल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यामध्येच धोनीसाठी एका चाहत्याने चक्क आपल्याना बायकोलाही सोडायचा निर्णय घेतला.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब यांच्यामध्ये मोहाली येथे हा सामना रंगला होता. हा सामना पंजाबच्या घरच्या मैदानावर असला तरी धोनीला सर्वाधिक चाहत्यांनी मैदानात पसंती दिली होती. चाहत्यांनी धोनीसाठी खास फलकही बनवून आणले होते. यामध्ये एका चाहत्याने एक भन्नाट फलक आणला होता. त्यावर चाहत्याने लिहिले होते की, " बायकोने मला विचारले, तुला मी हवी की महेंद्रसिंग धोनी? त्यावर  चाहत्याने उत्तर दिले नक्कीच धोनी."

पंजाबचा शेवट गोडलोकेश राहुल ( 71) आणि ख्रिस गेल (28) यांच्या 108 धावांच्या सलामीनेच किंग्स इलेव्हन पंजाबचा विजय पक्का केला होता. मात्र, हरभजन सिंगने पंजाबला लागोपाठ तीन धक्के देत सामन्यात चुरस निर्माण केली. निकोलस पुरणचा झेल सोडणे चेन्नई सुपर किंग्सला महागात पडले आणि पंजाबने विजयासह आयपीएलचा निरोप घेतला. चेन्नईचे 171 धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार केले. पुरणने 21 चेंडूंत 36 धावा केल्या. या पराभवामुळे चेन्नईला अव्वल स्थानावर कायम राहण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. पण, त्यांनी क्वालिफायर 1 मधील स्थान पक्के केले आहे. 

चेन्नई सुपर किंग्सने फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांच्या दमदार खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 171 धावांचे लक्ष्य ठेवले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून विक्रमाला गवसणी घातली. त्यांना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला.  ड्यू प्लेसिसचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. सॅम कुरनच्या अप्रतिम यॉर्करने ड्यू प्लेसिसचा त्रिफळा उडवला. ड्यू प्लेसिसने 55 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांसह 96 धावा केल्या.  रैना 38 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या. पंजाबच्या कुरनने तीन, तर मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी पंजाबला धडाकेबाज सुरुवात करून दिली. पण, चौकार षटकारांच्या आतषबाजीत गेलपेक्षा राहुल अधिक आक्रमक खेळ केला. लोकेशने 19 चेंडूंत अर्धशतक केले. आयपीएलमधील हे तिसरे जलद अर्धशतक ठरले. गेल आणि राहुल यांनी 12च्या सरासरीनं चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली.  या दोघांची 108 धावांची भागीदारी हरभजन सिंगने संपुष्टात आणली. भज्जीनं 11व्या षटकात राहुल व गेल यांना लागोपाठ माघारी पाठवले. भज्जीची हॅटट्रिक मात्र हुकली. राहुल 36 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकार खेचून 71 धावा करत माघारी परतला. गेलने 28 चेंडूंत 28 धावा केल्या. भज्जीनं पुढच्याच षटकात पंजाबला आणखी एक धक्का देत मयांक अग्रवालला माघारी पाठवले. ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर मुरली विजयने निकोलस पुरणचा सोपा झेल सोडला. त्याच पुरणने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स