Join us  

IPL 2019 : हरभजनचा आयपीएलमध्ये 'असाही' पराक्रम

हरभजनने या सामन्यात चार षटकांमध्ये २० धावा देत तीन बळी मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 9:21 PM

Open in App

चेन्नई, आयपीएल २०१९ : चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने पहिल्याच सामन्यात आपली जादू दाखवत इतिहास रचला आहे. हरभजनने या सामन्यात चार षटकांमध्ये २० धावा देत तीन बळी मिळवले.

आयपीएलमध्ये आतापर्यंत स्वत:च्याच गोलंदाजीवर सर्वाधिक झेल पकडणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये हरभजनने अव्वल क्रमांक पटकावला आहे. पहिल्या सामन्यात हरभजनने मोईन अलीचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल पकडला. हरभजनने स्वत:च्याच गोलंदाजीवर हा अकरावा झेल पकडत इतिहास रचला आहे. हा पराक्रम करताना हरभजनने चेन्नईच्याच ड्वेन ब्राव्होला पिछाडीवर टाकले आहे. ब्राव्होने असा पराक्रम दहा वेळा केला होता. 

आयपीएलमध्ये स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल टिपणारे गोलंदाज11 हरभजन सिंग10 ड्वेन ब्रावो7 सुनील नरिन6 किरॉन पोलार्ड

टॅग्स :हरभजन सिंगआयपीएल 2019