Join us  

IPL 2019: नावात बदल... नशीब बदलण्यासाठी दिल्ली डेअरडेविल्सचा 'नेम गेम'

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) सातत्याने निराशाजनक कामगिरी करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने नशीब बदलण्यासाठी नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 3:42 PM

Open in App

नवी दिल्लीः इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) सातत्याने निराशाजनक कामगिरी करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने नशीब बदलण्यासाठी नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने आणि मालकांनी हा निर्णय घेतला असून मंगळवारी सायंकाळी याची घोषणा करण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे नाव दिल्ली कॅपिटल किंवा दिल्ली कॅपिटल्स असे असू शकते.दिल्ली संघाने 2019च्या हंगामासाठी भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला आपल्या चमूत दाखल करून घेतले आहे. धवनला आपल्या चमूत घेत दिल्लीने मोठे यश मिळवले आहे. 11 वर्षांनंतर धवनचे दिल्ली संघात पुनरागमन होणार आहे. दिल्लीने 15 खेळाडूंना कायम राखले असून ते अजून 13 खेलाडू घेऊ शकतात. त्यांच्याकडे 25.5 कोटी रुपये आहेत. त्यामुळे 2019च्या हंगामात दिल्ली मजबूत संघ मैदानात उतरवण्यासाठी सज्ज आहे. यूबीए बास्केटबॉल लीगमधून दिल्ली संघाला कल्पना आली आहे. या लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स नावाचा संघ आहे. त्यात अमेरिकेत वॉशिंग्टन कॅपिटल्स नावाचा आईस हॉकी संघ आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली डेअरडेव्हिल्सने नवीन भागीदार जेएसडब्ल्यू यांनी काही बदल सुचवले आहेत. 2018च्या हंगामात दिल्ली संघाला अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि तेव्हापासूनच संघाचे नाव बदलण्याचा विचार सुरू आहे.  2018च्या हंगामाच्या सुरुवातीला संघाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर सोपवली होती. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सला दोन जेतेपद जिंकून देणारा गंभीर दिल्लीसाठी लकी ठरला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीची सुरुवातही निराशाजनक झाली. त्यानंतर त्याने कर्णधारपद सोडले आणि संघाची धुरा युवा खेळाडू श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली. 

टॅग्स :इंडियन प्रीमिअर लीगदिल्ली डेअरडेव्हिल्स