Join us  

IPL 2019 DC vs RR : राजस्थान रॉयल्सने गाशा गुंडाळला, दिल्लीचा विजय

नवी दिल्ली,  आयपीएल 2019  : गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावताना  दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. इशांत ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 3:20 PM

Open in App

07:13 PM

रिषभ पंतने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला

07:01 PM



 

07:01 PM

पंत आणि कॉलीन इंग्रामने दिल्लीचा विजय निश्चित केला. या दोघांची 22 धावांची भागीदारी सोढीनं संपुष्टात आणली. त्याने इंग्रामला बाद केले. 

06:37 PM

06:37 PM

श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. श्रेयस गोपाळने ही जोडी तोडली. त्याने अय्यरला ( 15) बाद केले. 
 

06:21 PM



 

06:16 PM

प्रत्युत्तरात दिल्लीला 28 धावांवर पहिला धक्का बसला. इश सोढीनं दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनला (16) परागकरवी झेलबाद केले. पुढच्याच चेंडूवर सोढीनं पृथ्वी शॉला ( 8) त्रिफळाचीत केले. 

05:49 PM

IPL 2019 DC vsRR : रियानपरागचीएकाकीझूंज, राजस्थानच्या9 बाद115 धावाhttps://t.co/m0Bm6g0jsH@rajasthanroyals@DelhiCapitals@IPL#DCvsRR#riyanparag

— Lokmat(@MiLOKMAT) May 4, 2019  

05:43 PM

परागने 47 चेंडूंत 50 धावा करून आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा मान पटकावला. परागने 17 वर्ष 178 दिवस असताना अर्धशतक झळकावले. त्याने संजू सॅमसनचा 18 वर्ष 169 दिवसांचा विक्रम मोडला. 

05:13 PM

परागने एका बाजूनं खिंड लढवत इश सोढीसह राजस्थानसा समाधानकारक पल्ला गाठून देण्याच्या दिशेने कूच करून दिली. बोल्टने ही जोडी तोडली. त्याने सोढीला ( 6) अमित मिश्राकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. 

05:32 PM

रियान पराग आणि श्रेयस गोपाळ हे राजस्थानचा डाव सावरतील असे वाटत होते. त्यांनी तसा खेळही केला, परंतु 12व्या षटकात अमित मिश्राने ही जोडी तोडली. मिश्राच्या फिरकीचा अंदाज चुकल्याने गोपाळ यष्टिचीत होऊन माघारी परतला. गोपाळने 18 चेंडूंत 12 धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीही पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता माघारी फिरला. रिषभ पंतने त्याचा झेल घेतला. मिश्राला हॅटट्रिकची संधी होती, परंतु ट्रेंट बोल्टने गोवथमचा झेल सोडला अन् मिश्राची संधी हुकली. पण, पुढच्याच षटकात त्यानं विकेट घेतली. त्याने गोवथमला इशांत शर्माकरवी झेलबाद करून माघारी पाठवले.
 

05:13 PM

ट्रेंट बोल्टने झेल सोडला अन् अमित मिश्रानं डोक्याला हात लावला

05:06 PM



 

05:05 PM

रियान पराग आणि श्रेयस गोपाळ हे राजस्थानचा डाव सावरतील असे वाटत होते. त्यांनी तसा खेळही केला, परंतु 12व्या षटकात अमित मिश्राने ही जोडी तोडली. मिश्राच्या फिरकीचा अंदाज चुकल्याने गोपाळ यष्टिचीत होऊन माघारी परतला. गोपाळने 18 चेंडूंत 12 धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीही पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता माघारी फिरला. रिषभ पंतने त्याचा झेल घेतला. मिश्राला हॅटट्रिकची संधी होती, परंतु ट्रेंट बोल्टने गोवथमचा झेल सोडला अन् मिश्राची संधी हुकली. पण, पुढच्याच षटकात त्यानं विकेट घेतली. त्याने गोवथमला इशांत शर्माकरवी झेलबाद करून माघारी पाठवले.
 

05:02 PM

IPLमधले 'हॅटट्रिक'वीर तुम्हाला माहीत आहेत का?

IPLमधले 'हॅटट्रिक'वीर तुम्हाला माहीत आहेत का?

05:01 PM

अमित मिश्राची आयपीएलमधील चौथी हॅटट्रिक हुकली



 

04:57 PM

स्टुअर्ट बिन्नीही पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता माघारी फिरला. रिषभ पंतने त्याचा झेल घेतला. 
 

04:56 PM

रियान पराग आणि श्रेयस गोपाळ हे राजस्थानचा डाव सावरतील असे वाटत होते. त्यांनी तसा खेळही केला, परंतु 12व्या षटकात अमित मिश्राने ही जोडी तोडली. मिश्राच्या फिरकीचा अंदाज चुकल्याने गोपाळ यष्टिचीत होऊन माघारी परतला. गोपाळने 18 चेंडूंत 12 धावा केल्या. 

04:34 PM

इशांतने दिले राजस्थानला धक्के



 

04:28 PM



 

04:28 PM

राजस्थानची पडझड थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. महिपाल लोमरोरही इशांच्या गोलंदाजीवर माघारी परलता. त्यांची अवस्था 4 बाद 30 अशी दयनीय झाली होती. 

04:25 PM

04:24 PM

पुढच्याच षटकात संजू सॅमसनला अती घाई नडली. पृथ्वी शॉने त्याला धावबाद केले. 



 

04:22 PM



 

04:21 PM

त्यानंतर लिव्हिंगस्टोनने फटकेबाजी केली, परंतु शर्माने चौथ्या षटकात लिव्हिंगस्टोनचा त्रिफळा उडवला. राजस्थानचे सलामीचे 2 फलंदाज 20 धावांवर माघारी परतले होते. 

04:09 PM

अजिंक्य रहाणे आणि लिएम लिव्हिंगस्टोन हे फलंदाज राजस्थानकडून सलामीला आले. संयमी सुरुवातीनंतर राजस्थानला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. दिल्लीच्या इशांत शर्माने राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला (2) शिखर धवन करवी झेलबाद करून माघारी पाठवले. 

03:47 PM

राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन, लिएम लिव्हिंगस्टोन, अजिंक्य रहाणे, रियान पराग, स्टुअर्ट बिन्नी, महिपाल लोम्रोर, कृष्णप्पा गोवथम, श्रेयस गोपाठ, इश सोढी, वरुण अॅरोन, ओशाने थॉमस

03:44 PM

दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कॉलीन इंग्राम, शेर्फाने रुथरफोर्ड, किमो पॉल, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, ट्रेंट बोल्ट

03:42 PM

03:36 PM

दिल्लीच्या संघात दोन बदल... किमो पॉल व इशांत शर्माची वापसी, ख्रिस मॉरिस व सुचिथ यांना विश्रांती



 

03:35 PM

कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचे पारडे जड

03:34 PM



 

03:33 PM



 

03:24 PM

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचा कस



 

03:24 PM

कोण मारणार बाजी?



 

टॅग्स :आयपीएल 2019दिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्स