IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: चेन्नई की दिल्ली, फायनलचे तिकीट कोणाला? हे ठरलीत 'गेम चेंजर्स'!

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:14 PM2019-05-10T17:14:33+5:302019-05-10T17:15:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: who will make place for final, Chennai super kings or Delhi Capitals? know who will be a Game Changer | IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: चेन्नई की दिल्ली, फायनलचे तिकीट कोणाला? हे ठरलीत 'गेम चेंजर्स'!

IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: चेन्नई की दिल्ली, फायनलचे तिकीट कोणाला? हे ठरलीत 'गेम चेंजर्स'!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विशाखापट्टणम, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघानी साखळी फेरीत 18 गुणांची कमाई केली होती, परंतु नेट रन रेटच्या जोरावर चेन्नईचे पारडे भारी ठरले होते. मात्र, पहिल्या क्वालिफायरमध्ये गतविजेत्या चेन्नईला मुंबई इंडियन्सकडून हार मानावी लागली होती, तर एलिमिनेटर सामन्यात दिल्लीने 2 विकेट राखून सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. त्यामुळे त्यांना प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. चेन्नईचा संघ हा आयपीएलमधला सर्वात अनुभवी संघ म्हणून ओळखला जात आहे. त्यांच्याकडे महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग, इम्रान ताहीर आणि शेन वॉटसन या दिग्गजांची फौज आहे. दुसरीकडे दिल्लीकडे युवा खेळाडूंचा भरणा आहे.   


आयपीएलमध्ये विजयाचे शतक साजरे करण्यासाठी चेन्नईला केवळ एक विजय हवा आहे. चेन्नईने 163 सामन्यांत 99 विजय मिळवले आहेत आणि त्यांचा विजयाची टक्केवारी ( 61.41%) ही अन्य संघापेक्षा चांगली आहे. त्यामुळे चेन्नईने आज दिल्लीवर विजय मिळवल्यास आयपीएलमध्ये 100 सामने जिंकणारा तो मुंबई इंडियन्सनंतर दुसरा संघ ठरणार आहे. मुंबईने 186 सामन्यात 106 विजय मिळवले आहेत. याच सामन्यात धोनीलाही एक विक्रमाची संधी आहे. या सामन्यात तीन बळी टिपल्यास आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा यष्टिरक्षकाचा मान त्याला मिळेल. कोलकाता नाईट रायडर्सचा दिनेश कार्तिक 131 बळींसह आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी यष्टिरक्षक आहे. धोनीच्या नावावर 129 बळी आहेत आणि त्यात 91 झेल व 38 यष्टिचीतचा समावेश आहे.


कोण ठरतील हुकुमी एक्के?
महेंद्रसिंग धोनी - यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचा कर्णधार धोनीची कामगिरी चढउतारांची राहिली आहे. पण, त्याने काही सामन्यांत मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावली आहे.  
श्रेयस अय्यर - दिल्लीच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अय्यर ( 450 धावा) आघाडीवर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने प्रथमच क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला आहे. 
इम्रान ताहीर - दक्षिण आफ्रिकेच्या 40 वर्षीय गोलंदाजाने यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंनाही लाजवेल अशी कामगिरी केली आहे. त्याला पर्पल कॅप नावावर करण्यासाठी तीन विकेटची गरज आहे.
 

आजच्या सामन्यातील संभाव्य संघ
चेन्नई सुपर किंग्स - मुरली विजय, फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, दीपक चहर, इम्रान ताहीर
 दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, शिखर धवन, कॉलिन मुन्रो, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शेर्फाने रुथरफोर्ड, अक्षर पटेल, किमो पॉल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, ट्रेंट बोल्ट. 

Web Title: IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: who will make place for final, Chennai super kings or Delhi Capitals? know who will be a Game Changer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.