Join us  

IPL 2019 : कर्णधार केनचे विल्यम्सनचे अर्धशतक, आरसीबीपुढे 176 धावांचे आव्हान

आरसीबीकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन विकेट्स पटकावल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 9:39 PM

Open in App

बंगळुरु, आयपीएल 2019 : सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनच्या दमदार खेळीच्या जोरावर त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुपुढे आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. आरसीबीकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन विकेट्स पटकावल्या. केनने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केल्यामुळे हैदराबादला प्रथम फलंदाजी करताना 175 धावा करता आल्या.

आरसीबीने नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार केन विल्यम्सनचा अपवाद वगळता हैदराबादच्या एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून राहता आले नाही. केनने यावेळी अर्धशतक झळकावल्यामुळे हैदराबादला आरसीबीपुढे सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

आऊट की नॉटआऊट, तुम्हीच बना थर्ड अम्पायर, पाहा हा व्हिडीओरॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद आजच्या सामन्यात एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. या सामन्यातील एक कॅच योग्य आहे की नाही, यासाठी आयपीएलने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओपुढे त्यांनी हा फलंदाज आऊट आहे की नाही, ते तुम्हीच थर्ड अम्पायर बनून ठरवा, असे म्हटले आहे.

ही गोष्ट घडली ती वॉशिंग्टन सुंदरच्या आठव्या षटकात. या आठव्या षटकातील पाचव्या चेंडूवर मनीष पांडेने मोठा फटका मारला. हा चेंडू उंच उडाला आणि झेल घेण्यासाठी आरबीसीचा हेटमायर सरसावला. त्यावेळी हेटमायरने सूर मारत चांगलाच झेल टिपला. त्यावेळी हा झेल आहे की नाही, यासाठी मैदानातील पंचांनी थर्ड अम्पायरला विचारणा केली. त्यानंतर आयपीएलने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना आवाहन केल्याचे पाहायला मिळाले आहे.

हा पाहा व्हिडीओ

जेव्हा उडी मारून पार्थिव पटेल गेला स्टम्पिंग करारॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आजच्या सामन्यात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. आरसीबीचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलने चक्क हवेत उडी मारून स्टम्पिंग करायला प्रयत्न केला.

ही गोष्ट घेतली ती सहाव्या षटकामध्ये. हे षटक युजवेंद्र चहल टाकत होता. यावेळी चहलचा सामना करत होता तो मनीष पांडे. सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मनीष पांडेल चकला. त्याच्या पायाला लागून चेंडू पटेलच्या दिशेने गेला. त्यावेळी पटेलने हवेत उडी मारत मनीषला यष्टीचीत करण्याचा उत्तम प्रयत्न केला.

हा पाहा व्हिडीओ

यंदाच्या आयपीएलमध्ये कोहली आज पहिल्यांदाच ठरला लकी, घडली 'ही' गोष्टयंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. पण तरीदेखील कोहली आज सामन्यापूर्वी आनंदात पाहायला मिळाला. कारण यंदाच्या हंगामात ही गोष्ट पहिल्यांदाच कोहलीच्या बाबतीत पाहायला मिळाली.

या सामन्यात आरसीबीने संघात तीन बदल केले. सामन्यापूर्वी कोहली आणि हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन टॉससाठी एकत्र आले होते.  टॉस झाल्यावर कोहलीच्या चेहऱ्यावर स्मित फुलल्याचे पाहायला मिळाले. कारण यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच कोहलीने नाणेफेक जिंकली होती.

नाणेफेक जिंकल्यावर कोहली म्हणाला की, " यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मी टॉस जिंकलो, त्यामुळे मी आनंदित आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये मला नाणेफेकीच्या कौलने हुलकावणी दिली होती. पण मोसमाच्या अखेरीस तरी मला टॉस जिंकता आला आहे."

टॅग्स :केन विलियम्सनरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद