IPL 2019 : केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्सकडून बर्थडे गिफ्ट; पाहा व्हिडीओ

IPL 2019: केदार जाधवला वाढदिवसाला चेन्नई संघाने दिलेली ही विजयाची भेट ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 03:35 PM2019-03-27T15:35:14+5:302019-03-27T15:36:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Birthday celebration of Kedar Jadhav with Chennai Super Kings team mates; Watch video | IPL 2019 : केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्सकडून बर्थडे गिफ्ट; पाहा व्हिडीओ

IPL 2019 : केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्सकडून बर्थडे गिफ्ट; पाहा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विजयी मालिका कायम राखताना मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेट्स राखून पराभूत केले. केदार जाधवला वाढदिवसाला चेन्नई संघाने दिलेली ही विजयाची भेट ठरली. या विजयानंतर सहकाऱ्यांनी केदारचा वाढदिवसही दणक्यात साजरा केला. सहकाऱ्यांनी ड्रेसिंग रुममध्ये केक कापून केदारचा बर्थडे साजरा केला. चेन्नई संघाच्या खेळाडूंची ही पार्टी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.  



शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांनी चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून दिला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईचा हा सलग दुसरा विजय ठरला. दिल्लीनं विजयासाठी ठेवलेले 148 धावांचे आव्हान चेन्नईने सहा विकेट्स राखून पार केले.  

शिखर धवनच्या ( 51) अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 147 धावा चोपल्या. पृथ्वी शॉ आणि धवन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. ड्वेन ब्राव्होन 33 धावा देत दिल्लीचे 3 फलंदाज बाद केले. त्यामुळे दिल्लीला निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 147 धावाच करता आल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध वादळी खेळी खेळणाऱ्या रिषभ पंतला ( 25) ब्राव्होने बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( 44) आणि सुरेश रैना ( 30) यांनी चेन्नईचा डाव सावरला. केदार जाधव ( 27) आणि धोनी ( 32) यांनीही दमदार खेळी करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.



 

पाहा व्हिडीओ...




Web Title: IPL 2019: Birthday celebration of Kedar Jadhav with Chennai Super Kings team mates; Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.