Join us  

IPL 2019 : तब्बल 102 सामन्यांनंतर भुवनेश्वर कुमारला मिळाला 'हा' बहुमान

भुवीला नेमका कोणता बहुमान आज मिळाला, हे तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 5:12 PM

Open in App

कोलकाता, आयपीएल 2019 : सनरायझर्स हैदराबादचा अनुभवी स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारला आज एक बहुमान मिळाला. पण हा बहुमान मिळण्यासाठी त्याला तब्बल आयपीएलचे 102 सामने वाट पाहायला लागली. भुवीला नेमका कोणता बहुमान आज मिळाला, हे तुम्हाला माहिती आहे का...

यावेळी हैदराबादच्या संघात पुनरागमन झाले ते डेव्हिड वॉर्नरचे. वार्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे गेल्यावर्षी आयपीएलमध्ये वॉर्नरला खेळता आले नव्हते. पण त्यापूर्वी हैदराबादच्या संघाचे कर्णधारपद वॉर्नरकडे होते. पण या बंदीनंतर मात्र त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलेले नाही. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादने 2016 साली आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. 2017 साली हैदराबादचा संघ बाद फेरीत पोहोचला होता. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. पण आता त्याला संघाचे कर्णधारपद सोडावे लागणार आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वार्नरला आयपीएलमधून निलंबित केल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार कोण होणार, अशी चर्चा सुरु होती. पण हैदराबादच्या संघव्यवस्थापनाने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. हैदराबादच्या संघाची कमान आता इंग्लंडच्या केन विल्यमसनच्या हाती सोपवण्यात आली आहे. पण विल्यमसन हा जायबंदी असल्यामुळे भुवीला हैदराबादचे कर्णधारपद देण्यात आले. तब्बल 102 सामने खेळल्यानंतर भुवीला हैदराबादच्या संघाचे कर्णधारपद मिळाले आहे.

 

इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात दुसरा सामना होत आहे तो, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन माजी विजेत्यांमध्ये. इडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ आयपीएलच्या हंगामाची दणक्यात सुरुवात करण्यासाठी आतुर आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या पुनरागमनामुळे हैदराबाद संघातील खेळाडूंचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. पण, या सामन्यात कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक हैदराबादचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज आहे. हैदराबाद संघाचा मध्यक्रम मजबूत करण्यासाठी मनीष पांडे आणि युसूफ पठाण संघात आहेत. तसेच भुवनेश्वर कुमार आणि संदीप शर्मा यांच्यामुळे वेगवान गोलंदाजी मजबूत झाली आहे. लिलावात सनरायझर्सने आपल्या अधिकाधिक खेळाडूंना कायम राखण्यात यश मिळवले.

टॅग्स :भुवनेश्वर कुमारआयपीएल 2019सनरायझर्स हैदराबाद