Join us  

IPL 2018 : युवराज आपल्या कर्णधारची ही इच्छा पूर्ण करणार का? 

सिक्सर किंग युवराज सिंग आपल्या कर्णधाराची ही इच्छा पूर्ण करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 4:42 PM

Open in App

नवी दिल्ली - आयपीएलमध्ये पंजाब संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर अश्विनने युवराजकडून त्याला अपेक्षित इच्छा व्यक्त केली. त्यामुळं भारताच सिक्सर किंग युवराज सिंग आपल्या कर्णधाराची ही इच्छा पूर्ण करणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यामध्ये उपस्थित झाला आहे. 

2018 च्या सत्रासाठी दोन दिवसांपूर्वी चांगली मते मिळूनही युवराजला डावलून अश्विनची निवड करण्यात आली. त्यानंतर काल झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये तो चाहत्यांच्या भेटीसाठी उपस्थित होता. यावेळी अश्विन युवराजचे कौतुक करताना म्हणाला की, युवराजचा मी मोठा फॅन आहे. तो मैदानावर कधी उतरतो आणि चौकार षटकारांची आतिषबाजी करतो त्याची मी वाट पाहतोय. 

युवराज मैदानावर असताना आपल्या खेळीनं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. आमच्या संघातील युवराज सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. आमि संघातील विजयामध्ये त्याचा मोठा वाटा असेल. पंजाबला जेतेपद मिळवून देण्यात युवराज सिंहाचा वाटा उचलेल असे अश्विन म्हणाला. पुढे बोलताना तो म्हणाला की, सध्या माझे सर्व लक्ष आयपीएलमधील सामन्याकडे आहे. कर्णधार म्हणून माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मला चांगल्या पद्धतीनं पार पाडायची आहे. युवराजने गेल्या 10 टी-20 सामन्यात 96 च्या सरासरीनं 217 धावा ठोकल्या आहेत. 

आयपीएलच्या 11 व्या मोसमासाठी यावर्षी सर्वच खेळाडूंची बोली लावण्यात आली होती.  बंगळुरुमध्ये झालेल्या लिलावात भारतीय संघातील अनुभवी अश्विनसाठी चेन्नई आणि पंजाबमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. शेवटी पंजाबनं मात करत अश्विनला खरेदी केलं. अश्विनसाठी पंजाबनं 7.6 कोटी रुपयांची बोली लावली. यापूर्वी अश्विने पुणे आणि चेन्नईच्या संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे.  पंजाब संघामध्ये आर. अश्निन, गेल, युवराज आणि डेविड मिलर  कर्णधारपदाच्या शर्यतित होते. पण पंजाबने कर्णधारपदाची धुरा अश्विनकडे सोपवली आहे.  

 

असा आहे पंजाब संघ - अक्षर पटेल (6.75 कोटी), रविचंद्रन अश्विन (7.6 कोटी ), युवराज सिंह (2 कोटी), करुण नायर (5.6 कोटी), लोकेश राहुल (11 कोटी), डेविड मिलर (3 कोटी), एरॉन फिंच (6.2 कोटी), मार्कस स्टोइनिस (6.2 कोटी), मयंक अग्रवाल (1 कोटी), अंकित सिंह राजपूत (3 कोटी), एंड्रू टाई (7.2 कोटी), मुजीब जादरान (4 कोटी), मोहित शर्मा (2.4 कोटी, राइट टू मैच), बरिंदर सरां (2.2 कोटी), क्रिस गेल (2 कोटी), बेन ड्वौर्शुइस (1.4 कोटी), अक्षदीप नाथ (1 कोटी), मनोज तिवारी (1 कोटी), मंजूर डार, प्रदीप साहू, मयंक डागर (20-20 लाख)   

टॅग्स :युवराज सिंगआर अश्विनआयपीएल 2018