Join us  

IPL 2018 : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडण्यात कोहली पहिला

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीचा पहिला क्रमांक लागत असल्याचे समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 6:17 PM

Open in App

चेन्नई, आयपीएल 2019 : यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांना निराश केले आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीचा पहिला क्रमांक लागत असल्याचे समोर आले आहे.

कोहली हा चांगला फलंदाज आहेच, पण त्याचबरोबर चपळ क्षेत्ररक्षकही आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र कोहलीकडून सातत्यपूर्ण फलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेले नाही. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये कोहलीला सहा वेळा झेल पकडण्याची संधी मिळाली होती. पण सहा पैकी फक्त दोन झेल कोहलीला पकडता आले. कोहलीकडून सहा पकी चार झेल सुटल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याबरोबर सर्वाधिक झेल सोडणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत कोहलीने पहिले स्थान पटकावले आहे.

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल 2019