Join us  

IPL 2018 : माझ्याबाबतच्या अफवा पसरवणं बंद करा; रिषभ पंतने केली ट्विटरवर विनंती

अफगाणिस्तान, इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी माझी निवड करण्यात आली नाही. त्यामुळे माझ्या रागाचा पारा चढला आणि हाच निवड समितीवरचा राग मी माझ्या खेळीद्वारे व्यक्त केला, असे पंतने म्हटले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 5:28 PM

Open in App
ठळक मुद्देहे वृत्त म्हणजे अफवा असल्याचे रिषभचे म्हणणे आहे. त्यामुळे ही अफवा पसरवणं बंद करा, अशी विनंती त्याने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा जमा आहेत त्या दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या रिषभ पंतच्या नावावर. पण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्यानंतरही त्याला भारताच्या संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे त्याने निवड समितीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण हे वृत्त म्हणजे अफवा असल्याचे रिषभचे म्हणणे आहे. त्यामुळे ही अफवा पसरवणं बंद करा, अशी विनंती त्याने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये पंतने 52.90 च्या सरासरीने 582 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याचा स्ट्राईक रेट हा 179.62 एवढा होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंतने 63 चेंडूंत 128 धावांची खेळी साकारली होती. त्याचे आयपीएलमधले हे पहिले शतक होते. पण या शतकानंतरही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे या सामन्यानंतर पंत चांगलाच भडकलेला दिसत होता. सामन्यानंतर झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने निवड समितीवर ताशेरे ओढले होते. 

मुलाखतीमध्ये पंत म्हणाला की,  " अफगाणिस्तान, इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी माझी निवड करण्यात आली नाही. त्यामुळे माझ्या रागाचा पारा चढला आणि हाच निवड समितीवरचा राग मी माझ्या खेळीद्वारे व्यक्त केला. मला आशा आहे की, निवड समितीने माझी ही खेळी पाहिली असेल आणि या खेळीनंतर मी संघातील स्थान मिळवण्यासाठी लायक होतो, असे वाटत आहे. "

ट्विटरवर पंतने काय विनंती केली ते वाचा

पंतच्या मुलाखतीनंतर याबाबतचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर पंतवर जोरदार टीका होत होती. त्यामुळे पंतला आपली बाजू सावरावी लागली. ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करताना पंत म्हणाला की,  " माझ्या वक्तव्याबाबतच्या काही अफवा पसरल्या आहेत. भारतीय संघात निवड न झाल्याबद्दल मी नाराजी व्यक्त केली नाही किंवा कुणालाही दोष दिलेला नाही. त्यामुळे या अफवा पसरवणं बंद करा आणि मला क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करू द्या." 

टॅग्स :आयपीएल 2018दिल्ली डेअरडेव्हिल्स