Join us  

IPL 2018 : सनरायजर्स हैद्राबादच्या कर्णधारपदी गब्बर?

याआधी शिखर धवननं हैदराबाद आणि दिल्लीच्या संघाचे पर्यायी कर्णधार म्हणून नेतृत्व केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 6:36 AM

Open in App

हैदराबाद : चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्यास या खेळाडूंवर बंदी घातली. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना मोठा धक्का बसला आहे.  काल डेव्हिड वॉर्नरची आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी स्टीव्हन स्मिथची राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सनं कर्णधारपदाची धुरा रहाणेकडे सोपवली आहे. वॉर्नर हैदराबादचा कर्णधार आहे, पण त्याच्याऐवजी कोण नवा कर्णधार असेल याविषयी हैदराबादनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. आज ते नवीन कर्णधाराची घोषणा करतील. 

आयपीएलच्या 11 व्या सत्राला सात एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे मैदानावरुन सुरुवात होईल. त्यामुळं हैदराबाद आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा लवकरच करेल. सुत्रांच्या वृत्तानुसार हैदाराबद संघाच्या कर्णधाराची निवड आज रात्रीपर्यंत होण्याची शक्यता आहे. हैदराबादच्या कर्णधारपदासाठी सर्वात आघाडीचे आणि चर्चित नाव शिखर धवनचे आहे.  डेव्हिड वॉर्नर नसल्यामुळे हैदराबादकडे शिखर धवन, इओन मॉर्गन आणि केन विलियमसन यांच्यापैकी एकाला कर्णधार बनवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण विलियमसनची टीममधली जागा पक्की नाही.  त्यामुळे धवन किंवा मॉर्गनकडे कर्णधारपदाची सूत्र जाऊ शकतात.

शिखर धवन हा गेल्या अनेक वर्षांपासून हैदराबादकडून खेळत आहे. धवनची अंतिम 11 जणातील जागा निश्चित आहे. आपीएलमध्ये त्याची कामगीरी सातत्यपूर्ण आहे.  याआधी शिखर धवननं हैदराबाद आणि दिल्लीच्या संघाचे पर्यायी कर्णधार म्हणून नेतृत्व केलं आहे. बीसीसीआयनंही धवनशी सर्वाधिक किंमतीचा म्हणजेच ए प्लसचा करार केला आहे. या सगळ्या जमेच्या बाजू असल्यामुळे धवनची हैदराबादचा कर्णधार म्हणून निवड होऊ शकते. 

टॅग्स :आयपीएल 2018शिखर धवनचेंडूशी छेडछाड