Join us  

IPL 2018 : चेन्नईतले सामने आता पुण्यात होणार

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान झालेल्या घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 10:24 PM

Open in App
ठळक मुद्देमंगळवारी चेन्नई येथे झालेल्या सामन्यात लाँग ऑनला उभ्या असलेल्या यजमान संघातील रवींद्र जडेजाच्या दिशेने बूट फेकण्यात आला होता.

नवी दिल्ली : कावेरी पाणी वाटप प्रकरणाचा फटका चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएलमधील संघाला बसला आहे. चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने आता पुण्याला हलवण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सात सामने खेळवण्यात येणार होते. मात्र कावेरी पाणी वाटप प्रकरणाचा फटका या सामन्यांना बसा आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान झालेल्या घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात चेन्नईचा संघ क्षेत्ररक्षण करताना आठव्या षटकात मैदानावर बूट फेकण्यात आले. लाँग ऑनला उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाच्या दिशेनं हा बूट फेकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर बीसीसीआयने चेन्नईतील सामने अन्यत्र हलवण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :आयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्स