Join us  

IPL 2018: कॅप्टन कोहली 'यांच्या' समोर ठरतो फेल, आरसीबीचं टेन्शन वाढलं

दोन्हीही संघासाठी आजची मॅच अत्यंत महत्त्वाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 1:01 PM

Open in App

जयपूर- राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोरमध्ये आज सामना रंगणार आहे. दोन्हीही संघासाठी आजची मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. आज जो संघ जिंकेल त्या संघाला प्लेऑफमध्ये जागा मिळविण्याची संधी आहे. कॅप्टन विराट कोहलीच्या आरसीबीची या सत्रात कामगिरी विशेष नव्हती पण गेल्या तीन सामन्यात विजय मिळवत आरसीबीने आयपीएलमध्ये जोरदार वापसी केली आहे. 

आरसीबीला आजचा सामना जिंकायचा असेल तर विराट कोहलीला रन्स करावेच लागतील. पण राजस्थान विरूद्धचा सामना आरसीबीसाठी सोपा नाही. याचं कारण म्हणजे धवल कुलकर्णी. राजस्थानच्या या गोंलदाजासमोर विराट कोहलीची कामगिरी काही खास ठरलेली नाही. धवलच्या 71 बॉल्सचा विराटने आत्तापर्यंत सामना केला आहे. त्यामध्ये विराटला फक्त 91 रन्स करता आले. याचदरम्यान, चार वेळा धवलच्या बॉलवर विराट आऊट झाला. म्हणूनच आजच्या सामन्यात जास्तीत जास्त रन्स करून जिंकण्याचं आव्हान विराट समोर आहे. 

धवलच्या खेळीपासून विराट जरी वाचला तरी दुसरं टेन्शन स्पिनर्सचं आहे. या सत्रात विराट सर्वात जास्त वेळा म्हणजेच 7 वेळा स्पिनर्सच्या बॉलवर आउट झाला आहे. 

टॅग्स :आयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्सविराट कोहली