Join us  

IPL 2018: राजस्थानपुढे केकेआर संघाचे कडवे आव्हान

उभय संघांदरम्यान एलिमिनेटर लढत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:28 AM

Open in App

कोलकाता : माजी विजेता राजस्थान रॉयल्स आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये दोन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्ससोबत उद्या बुधवारी ईडनगार्डन्सवर खेळणार आहे. पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार असल्यामुळे या लढतीच्यानिमित्ताने चाहत्यांना उभय संघांकडून रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळेल.नाईट रायडर्सने यंदाच्या मोसमात आतापर्यंत दोन्ही सामन्यांत राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. गेल्या महिन्यात जयपूरमध्ये सात गडी राखून पराभूत केल्यानंतर या आठवड्यापूर्वी ईडनगार्डन्सवर ६ गडी राखून पराभव केला आणि प्लेआॅफमध्ये स्थान निश्चित केले. सलग तीन विजय मिळवणाºया केकेआर संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. त्यांनी सहाव्यांदा अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे.दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील संघाने मजबूत गोलंदाजी आक्रमण असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गेल्या लढतीत स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. चारही क्वालिफायर संघांमध्ये नशिबाने गृहमैदानावर खेळण्याची संधी लाभलेला केकेआर एकमेव संघ आहे. बुधवारच्या लढतीतील विजेता संघ सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यापैकी एका संघासोबत दुसºया क्वालिफायरमध्ये खेळेल. ही लढतही कोलकातामध्येच होणार आहे. त्यातून अंतिम फेरी गाठणारा दुसरा संघ निश्चित होईल.आरसीबीचा पराभव केल्यानंतरही प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्यासाठी राजस्थानला उर्वरित २ सामन्यांचे निकाल अनुकूल ठरावे, यासाठी प्रार्थना करावी लागणार होती. त्यांची प्रार्थना फळाला आली व मुंबई व पंजाब आपापल्या लढती गमावित प्लेआॅफच्या शर्यतीतून बाहेर पडले.दुसºया बाजूचा विचार करता केकेआरसाठी कार्तिकने ६ वेळा नाबाद खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने आतापर्यंत ५४.७८ च्या सरासरीने ४३८ धावा केल्या आहेत. त्रिनिदादचा फिरकीपटू नरेनने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याने संघाला आक्रमक सुरुवात करून देताना १८९.०१ च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या आहेत.फिरकीपटूंनी केकेआरसाठी आपली भूमिका चोख बजावली आहे, पण वेगवान गोलंदाजांना मात्र आपली छाप सोडता आली नाही. कर्नाटकचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने हैदराबादविरुद्धच्या गेल्या लढतीत ३० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले आहेत. तो कामगिरीत सातत्य राखण्यात प्रयत्नशील राहील. (वृत्तसंस्था)अजिंक्यला चांगली कामगिरी करावी लागेलएलिमिनेटरमध्ये आता अजिंक्य रहाणेच्या संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. त्यासाठी सर्वांत मोठे आव्हान सुनील नरेन, पीयूष चावला व कुलदीप यादव या फिरकी त्रिकुटाविरुद्ध वर्चस्व गाजवण्याचे राहील. यादवने गेल्या लढतीत २० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले होते.त्याने यंदाच्या मोसमात ३२४ धावा केल्या आहेत. संजू सॅम्सन व राहुल त्रिपाठी यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची आशा आहे. दक्षिण आफ्रिकेचे हेनरिच क्लासेन फिनिशरच्या भूमिकेत आहे.

टॅग्स :आयपीएल 2018क्रिकेटकिंग्ज इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्सआयपीएलसनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स