Join us  

IPL 2018 : चेन्नईच्या संघासाठी धावून आला ' हा ' फलंदाज

केदार जाधव आणि त्यानंतर सुरेश रैना यांच्या दुखापतींमुळे चेन्नई सुपर किंग्जचा संघ चिंतेत होता. या परिस्थित सारे काही विसरून ' हा ' फलंदाज संघासाठी धावून आला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 7:18 PM

Open in App
ठळक मुद्देमुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीसाठी सराव करत असताना विजयच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. त्यामुळे गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळवण्यात आले नव्हते.

मुंबई : केदार जाधव आणि त्यानंतर सुरेश रैना यांच्या दुखापतींमुळे आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा संघ चिंतेत होता. कारण केदार दुखापतीमुळे या हंगामात खेळू शकणार नाही, तर रैनाला दोन सामन्यांसाठी विश्रांती घ्यावी लागणार आहे. या परिस्थित सारे काही विसरून ' हा '  फलंदाज संघासाठी धावून आला आहे. 

केदारच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या हंगामात आपल्याला दिसणार नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात तो फलंदाजीला आला होता. पण स्नायूंची दुखापत झाल्याने तो जखमी निवृत्त झाला होता. पण अखेरच्या षटकात संघाला केदारची गरज होती. त्यावेळी तो मैदानात उतरला आणि धडाकेबाज फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. पण त्यानंतर त्याची दुखापत अधिक बळावली आणि त्यामुळेच त्याला दीड महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

रैनाच्या पायाला दुखापत झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात सुनील नरिनच्या गोलंदाजीवर धाव घेताना रैनाला ही दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आगामी दोन सामने खेळता येणार नाही.

दोन फलंदाज जायबंदी झाल्यावर त्यांची जागा कोण घेणार, याची चिंता चेन्नईच्या संघाला होती. पण यावेळी मुरली विजय संघासाठी धावून आला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या लढतीसाठी सराव करत असताना विजयच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. त्यामुळे गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळवण्यात आले नव्हते. पण आता संघाला गरज असताना कोणत्याही परिस्थितीत खेळण्यासाठी विजयने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :आयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्ससुरेश रैना