IPL 2018 : एक्झाम विथ आयपीएल... बापरे!

एक्झामचा काळ म्हणजे, फुल्ल टेन्शन बॉस... नोट्स, आयएमपी, इम्पॉर्टंट पेपर सेट्स अशी अनेक ‘रसद’ गोळा करण्यातंच कॉलेजियन्सचा वेळ जात आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:40 AM2018-04-10T02:40:08+5:302018-04-10T02:40:08+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: Examination with IPL ... Father! | IPL 2018 : एक्झाम विथ आयपीएल... बापरे!

IPL 2018 : एक्झाम विथ आयपीएल... बापरे!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- रोहित नाईक
एक्झामचा काळ म्हणजे, फुल्ल टेन्शन बॉस... नोट्स, आयएमपी, इम्पॉर्टंट पेपर सेट्स अशी अनेक ‘रसद’ गोळा करण्यातंच कॉलेजियन्सचा वेळ जात आहे. बरं... हे सर्व पाहिजे त्या स्वरूपात मिळालं की, त्यावर कामही बरंच करावं लागतं... त्याचं वेगळ टेन्शन... शिवाय घरच्यांकडून मिळणारे ‘डोस’ वेगळे... टीव्ही बंद, मोबाइल दूर ठेवायचा... मोबाइल दूर म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप दूर... (हा म्हणजे अन्यायच की)... पण सध्याच्या एक्झाम फिव्हरमध्ये कॉलेजियन्स सर्वात जास्त वैतागलेत, ते टीव्ही बंद केल्यामुळे... का म्हणजे? सध्या सुरू असलेला ‘आयपीएल’ धडाका बघणार कसा?...
बॉस... एक्झाम असो, असाइन्मेंट सबमिशन असो किंवा काही इतर कारण असो, आयपीएलच्या वेळापत्रकात अ‍ॅडजेस्टमेंट कोणालाच आवडत नाही, पण काय करणार... ईअर एंड एक्झाम आहे म्हटल्यावर, थोडा वेळ आयपीएल बाजूला ठेवावेच लागेल, पण तरी अभ्यास करताना आयपीएलचा विचार डोक्यात घुसतोच की, त्याला कसं रोखणार... आणि त्यामुळेच यंदा कॉलेजियन्सची या टी२० धमाक्यामध्ये मोठी ‘कसोटी’ लागली आहे.
परीक्षेचा अभ्यास पूर्ण झालेला नाही, या दु:खापेक्षा आपली मुंबई इंडियन्स टीम हरली, याचे दु:ख सर्वात जास्त झाले. एकूणच या आयपीएल सर्कसच्या लाटेमध्ये स्वार होत, अभ्यासाची नाजूक होडी वल्हविण्याचे टेन्शन कॉलेजियन्सला आले आहे. हळूच मोबाइलवर कब्जा करत नेटवर आयपीएल स्कोर चेक करून मनशांती करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. तर काही जण दिवसभर रट्टा मारून, रात्री ८ ते १२ ची वेळ राखून ठेवत आहेत... भले त्यासाठी सकाळपासून मोबाइल स्विच आॅफ ठेवावा लागला तरी चालेल... पण आयपीएल मिस होता कामा नये... थोडक्यात, आयपीएल आणि एक्झाम अशी तारेवरची कसरत, सध्या कॉलेजियन्सच्या घराघरामध्ये पाहायला मिळत आहे...
>फ्रेंड्स... आयपीएल जरी सुरू असली, तरी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. अभ्यासामध्ये काही वेळ करमणूक पाहिजेत, पण तो करमणूक काही मिनिटांचा असू द्या... एक्झाम संपायला आता फार-फार तर काही दिवसंच उरलेत. त्यानंतर, आयपीएलचा आनंद घ्यायला तुम्हाला कोणीही रोखणार नाही, पण या काही दिवसांपुरता फुल्ल कंट्रोल करत सर्व लक्ष अभ्यासावर द्या.
सो... आॅल दी बेस्ट फ्रेंड्स...
एक्झाम सुरू असताना आयपीएल म्हणजे फुल्ल वाट लागते. मॅच बघायला टीव्ही लावला, तर आईचा ओरडा पडतो. त्यामुळे अभ्यासात लक्ष अजिबात लागत नाही. आता, एक्झाम संपायचीच वाट पाहतोय. एकीकडे नावडता अभ्यास, तर दुसरीकडे आवडता ‘हिटमॅन’ अशी पंचाइत झाली आहे, पण तरी आता अभ्यासाकडे लक्ष देत आहे. त्यानंतर, आयपीएल एके आयपीएल....
- वैभव शिंदे
एक्झामच्या टेन्शनमध्ये आयपीएलमुळे थोडं रिलॅक्स व्हायला मिळतं. पेपर जरी अर्धवट लिहिला, तरी मॅच मात्र पूर्ण बघतो. यामध्ये आईचा ओरडा पडतो, तरी एक्झाम आणि आयपीएल असा ताळमेळ साधणे सवयीचे झाले आहे. आता आयपीएलचा निकाल लगेच लागेल, पण आमचा ‘निकाल’ कसा आणि कधी लागणार हेच पाहावे लागेल.
- अंकित बांदल
टीवायमुळे आयपीएल पाहायला मिळत नाही. अभ्यास करतानाही मॅचचा विचार सुरू असतो. पॉइंट्सची रट्टेगिरी सुरू असली, तरी टॉस कोणी जिंकला, पहिली बॅटिंग कोणाची, कोणी किती रन्स केले व कोण जिंकले, याचीच चिंता असते. यासाठी मोबाइलवरूनही अपडेट घेत असते. खरं म्हणजे, एक्झामनंतरच आयपीएल पाहिजे होती, पण आता नाइलाज आहे.
- स्वप्नाली म्हात्रे

Web Title: IPL 2018: Examination with IPL ... Father!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.