Join us  

IPL 2018 : ... तर ख्रिस गेल बंगळुरुच्या संघात पुन्हा जाऊ शकतो, कसे ते वाचा

जर बंगळुरुच्या संघाला गेलला आपल्या संघात सामील करून घ्यायचे असेल, तर ते अशक्य नक्कीच नाही. कदाचित तुम्हाला हे खोटे वाटत असेल, पण आयपीएलमधल्या या नवीन नियमामुळे ते शक्य होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 7:00 PM

Open in App
ठळक मुद्देआयपीएलमधील ही देवाण-घेवाण 10 मेपर्यंत सुरु असेल.

नवी दिल्ली : ख्रिस गेल सध्या तुफानी फलंदाज करतोय. तो आहे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात. यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघात होता. पण आता जर बंगळुरुच्या संघाला गेलला आपल्या संघात सामील करून घ्यायचे असेल, तर ते अशक्य नक्कीच नाही. कदाचित तुम्हाला हे खोटे वाटत असेल, पण आयपीएलमधल्या या नवीन नियमामुळे ते शक्य होऊ शकते.

आयपीएलच्या या मोसमापासून हा नवीन नियम सुरु करण्यात आला आहे. या नियमानुासार स्पर्धा मध्यावर असतानाही खेळाडूंची देवाण-घेवाण करता येऊ शकते. जगभरातील फुटबॉलच्या काही स्पर्धांमध्ये या नियमाचा बऱ्याच वर्षांपासून अवलंब केला जात आहे. आयपीएलने या वर्षी हा नियम प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे. 

देवाण-घेवाण कधीपासून...सध्याच्या घडीला आयपीएलमधील प्रत्येक संघ जवळपास 7-8 सामने खेळले आहेत. त्यामुळे आता या देवाण-घेवाणीला सुरुवात झाली आहे. ही देवाण-घेवाण 10 मेपर्यंत सुरु असेल. या अकरा दिवसांमध्ये आपल्या संघात जो खेळाडू हवा आहे, तो त्यांना आपल्या संघात सामील करता येऊ शकतो.

कशी होऊ शकते देवाण-घेवाणजर एखाद्या संघाला दुसऱ्या संघातील एक खेळाडू हवा असेल, तर त्यासाठी प्रथम त्या खेळाडूची इच्छा महत्वाची असेल. खेळाडू तयार असला तरी संघाच्या परवानगीशिवाय तो दुसऱ्या संघातून खेळू शकत नाही.

टॅग्स :आयपीएल 2018