Join us  

IPL 2018 : डि'व्हिलियर्सने एका हाताने चेंडू स्टेडियमबाहेर फटकावला, पाहा हा व्हिडीओ

डि'व्हिलियर्सने 44 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 82 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 10:09 PM

Open in App

बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डाव यावेळी सावरला तो एबी डि'व्हिलियर्सने. डि'व्हिलियर्सने 44 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 82 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीमध्ये डि'व्हिलियर्सने चक्क एका हाताने षटकार मारला आणि हा चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.

ही गोष्ट घडली सामन्याच्या 19व्या षटकात. मोहम्मद शमी हे षटक टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डि'व्हिलियर्सने एक फटका मारला. त्यानंतर तो चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.

हा पाहा  व्हिडीओ

एबी डि'व्हिलियर्सच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे 203 धावांचे आव्हान ठेवता आले.

पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांनी आक्रमक सुरुवात केली. पण कोहलीला यावेळी जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. कोहली 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर पटेल आणि डि'व्हिलियर्स यांची चांगलीच जोडी जमली. पण पटेलला अर्धशतक झळकावण्यात अपयश आले. पटेल बाद झाल्यावर आरसीबीची मधली फळी कोसळली. यावेळी डि'व्हिलियर्सने संघाला सावरले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडण्यात कोहली पहिलायंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांना निराश केले आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीचा पहिला क्रमांक लागत असल्याचे समोर आले आहे.

कोहली हा चांगला फलंदाज आहेच, पण त्याचबरोबर चपळ क्षेत्ररक्षकही आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र कोहलीकडून सातत्यपूर्ण फलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेले नाही. कारण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये कोहलीला सहा वेळा झेल पकडण्याची संधी मिळाली होती. पण सहा पैकी फक्त दोन झेल कोहलीला पकडता आले. कोहलीकडून सहा पकी चार झेल सुटल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याबरोबर सर्वाधिक झेल सोडणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत कोहलीने पहिले स्थान पटकावले आहे. डि'व्हिलियर्सने यावेळी 44 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 82 धावा केल्या.

कोहलीच्या पावलावर त्यांच्या संघानेही पाऊल ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण आतापर्यंत बंगळुरुच्या संघापुढे 50 वेळा झेल पकडण्याच्या संधी आल्या. या 50पैकी 20 झेल बंगळुरुच्या संघाने सोडले आहेत. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल राजस्थान रॉयल्सच्या जेफ्रो आर्चरने सोडले आहेत. आर्चरला सहापैकी एकही झेल पकडता आलेला नाही.

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर