Join us  

IPL 2018 : एबी डी' व्हिलियर्सने जाहीर केले आपले ' सिक्रेट '

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामन्यात डी' व्हिलियर्सने तुफानी फलंदाजी केली होती. या सामन्यात डी' व्हिलियर्सने 39 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 90 धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. या खेळीनंतर डी' व्हिलियर्सने आपले ' सिक्रेट ' साऱ्यांना सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 5:57 PM

Open in App
ठळक मुद्देचेंडू चांगलाच वळत होता. त्यावेळी धावा काढणे सोपे नव्हते, तरीही मी फटकेबाजी करू शकलो. कारण त्याचे एक ' सिक्रेट ' आहे, जे आज मी तुम्हाला सांगतो, असे डी' व्हिलियर्स म्हणाला.

बंगळुरु : प्रत्येत खेळाडूचे काही ना काही ' सिक्रेट ' असते. तो खेळाडू जर नावारुपाला आलेला असेल तर त्याचे ' सिक्रेट ' ऐकायला साऱ्यांनाच आवडते. तो खेळाडू जर एबी डी' व्हिलियर्स असेल तर साऱ्यांनाच त्याची उत्सुकता असेल. हे ' सिक्रेट ' दस्तुरखुद्द डी' व्हिलियर्सनेच जाहीर केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामन्यात डी' व्हिलियर्सने तुफानी फलंदाजी केली होती. या सामन्यात डी' व्हिलियर्सने 39 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 90 धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. या खेळीनंतर डी' व्हिलियर्सने आपले ' सिक्रेट ' साऱ्यांना सांगितले आहे.

या सामन्यातील फलंदाजीनंतर डी' व्हिलियर्स म्हणाला की, " या सामन्यात फलंदाजी करणे सोपे नव्हते. कारण चेंडू चांगलाच वळत होता. त्यावेळी धावा काढणे सोपे नव्हते, तरीही मी फटकेबाजी करू शकलो. कारण त्याचे एक ' सिक्रेट ' आहे, जे आज मी तुम्हाला सांगतो. जेव्हा प्रतिस्पर्धी संघ किंवा गोलंदाज तुमच्यावर शिरजोर होताना दिसत असेल तेव्हा त्यांच्यावर आक्रमण करायचे असते. तुम्ही जर योग्यपद्धतीने आक्रमण केले तर प्रतिस्पर्धी संघ पिछाडीवर जातो. हे माझ्या फलंदाजीचे ' सिक्रेट '  आहे. "

यंदाच्या कामगिरीबद्दल डी' व्हिलियर्स म्हणाला की, " या हंगामात आमच्याकडून चांगली कामगिरी होत आहे. माझ्या कामिगरीने संघ कसा विजयी ठरू शकतो, याचा विचार मी करत असतो. दिल्लीविरुद्ध माझ्या खेळीने संघ जिंकला, यापेक्षा जास्त आनंद मला नाही. "

टॅग्स :आयपीएल 2018एबी डिव्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर