Join us  

राष्ट्रकुल स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटची एन्ट्री; 2022च्या स्पर्धेत समावेश

र्मिंगहॅम येथे 2022मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 2:12 PM

Open in App

मुंबई : बर्मिंगहॅम येथे 2022मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) केलेला अर्ज राष्ट्रकुल स्पर्धा आयोजकांनी मान्य केला. त्यामुळे 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या ट्वेंटी-20 स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. याआधी 1998च्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट खेळवण्यात आले होते. त्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती. आता 24 वर्षानंतर पुन्हा क्रिकेट राष्ट्रकुल स्पर्धेत दिसेल.  या स्पर्धेत 8 संघांचा समावेश असेल आणि आयसीसी व इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड यांनी संयुक्तपणे अर्ज दाखल केले होते. सर्व सामने एडबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येतील. 1998 साली राष्ट्रकुल स्पर्धेत झालेली क्रिकेट स्पर्धा ही 50 षटकांची होती. ''महिला क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील समावेशामुळे महिला क्रिकेटचाही प्रसार होईल,'' असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनू शॉहनी यांनी सांगितले.    

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेटइंग्लंडराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८