Join us  

भारतीय पोरींची कमाल! दीप्ती शर्माची ३८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; इंग्लंडची पळताभूई

India Women vs England Women, Only Test - ९ वर्ष व २५ दिवसानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 3:51 PM

Open in App

India Women vs England Women, Only Test - ९ वर्ष व २५ दिवसानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवशी ७ बाद ४१० धावा उभारून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या डावात ४२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंड महिला संघाचा पहिला डाव १३६ धावांत गुंडाळला. दीप्ती शर्माने ५.३ षटकांत ७ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. दीप्तीने या कसोटीत १९८५ सालच्या भारतीय महिला खेळाडूच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

भारताकडून सथिश शुभा ( ६९), जेमिमा रॉड्रीग्ज ( ६८), यास्तिका भाटीया ( ६६), दीप्ती शर्मा ( ६७) व हरमनप्रीत कौर ( ४९) यांनी दमदार खेळ केला. महिला कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या दिवशी ४०० हून अधिक धावा करणारा भारत हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी १९३५ मध्ये इंग्लंडने क्राईस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद ४३१ धावा केल्या होत्या. त्यांनी न्यूझीलंडचा पहिला डाव ४४ धावांत गुंडाळला होता. अशा प्रकारे या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण ४७५ धावा झाल्या होत्या.  २०२२ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी ४४९ धावा झाल्या होत्या, पंरतु यापैकी ऑस्ट्रेलियाने ५ बाद २०४ व इंग्लंडने ९ बाद २४५ धावा केल्या होत्या. 

कालच्या ७ बाद ४१० वरून आज सुरुवात करताना भारतीय महिलांना १८ धावाच जोडता आल्या. पण, त्यांनी इंग्लंडसमोर आव्हानात्मक धावा उभ्या केल्या होत्या. इंग्लंडचा संपूर्ण संघ ३५.३ षटकांत १३६ धावांत तंबूत परतला. नॅट शिव्हर-ब्रंटने सर्वाधिक ५९ धावा केल्या. दीप्ती शर्माने ५.३ षटकांत ४ निर्धाव षटकं टाकली आणि ७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. इंग्लंडविरुद्धच्या भारतीय महिलाने कसोटीत केलेली ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. १९९५मध्ये नीतू डेव्हिडने ५३ धावांत ८ विकेट्स घेतल्या होत्या. १९९९ मध्ये पुर्णिमा रावने २४ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. झुलन गोस्वामीने तीन वेळा ( ५-२५, ५-३३, ५-४५) असा पराक्रम केला आहे.  पण, दिप्तीने या कामगिरीसह विक्रमाची नोंद केली.

महिला क्रिकेटमध्ये एकाच कसोटीत अर्धशतक व पाच विकेट्स घेणारी ती भारताची दुसरी खेळाडू ठरली. १९८५ मध्ये शुभांगी कुलकर्णी यांनी न्यूझीलंडविरुद्ध असा पराक्रम केला होता.  

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध वेस्ट इंडिज