Join us  

जेम्स अँडरसनने जेव्हा पदार्पण केले, तेव्हा इंग्लंडच्या आजच्या संघातील दोन खेळाडू जन्मलेही नव्हते

IndVs Eng 2nd Test: ४१ वर्षे आणि १८७ दिवसांचा जेम्स अँडरसन भारतात कसोटी खेळणारा पाचव्या क्रमांकाचा सर्वांत वयस्कर खेळाडू तर पहिल्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 10:13 AM

Open in App

४१ वर्षे आणि १८७ दिवसांचा जेम्स अँडरसन भारतात कसोटी खेळणारा पाचव्या क्रमांकाचा सर्वांत वयस्कर खेळाडू तर पहिल्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज ठरला आहे. गमतीची बाब म्हणजे या सामन्यात पदार्पण करणारा शोएब बशीर आणि रेहान अहमद यांच्या वयाची बेरीज केली असता ती अँडरसनच्या वयापेक्षा कमी भरते. तसेच या दोघांचा जन्म होण्यापूर्वीच अँडरसनने आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले होते. विशाखापट्टणमच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने बशीरसोबतच रेहान अहमद या १९ वर्षाच्या खेळाडूला संघात स्थान दिले आहे.

भारताच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणारे सर्वांत वयस्कर खेळाडू

■ ४५ वर्षे ३०० दिवस, जॉन ट्राईकोस, झिम्बाब्वे (१९९३)

• ४४ वर्षे १०२ दिवस, आमीर इलाही, पाकिस्तान (१९५२)

■ ४२ वर्षे १०० दिवस, हॅरी इलियॉट, इंग्लंड (१९३४)

■ ४१ वर्षे ३०० दिवस, विनू मंकड, भारत (१९५९)

= ४१ वर्षे १८७ दिवस, जेम्स अँडरसन, इंग्लंड (२०२४)

भारतात कसोटी सामना खेळणारे सर्वांत वयस्कर वेगवान गोलंदाज

■ ४१ वर्षे १८७ दिवस, जेम्स अँडरसन, इंग्लंड (२०२४) • ४१ वर्षे ९२ दिवस, लाला अमरनाथ, भारत (१९५२)

• ३८ वर्षे ११२ दिवस, रे लिंडवॉल, ऑस्ट्रेलिया (१९६०)

दोन तरुण तुर्क, एकमेव म्हातारा अर्क

• इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या शोएब बशीरचे वय २० वर्षे ११२ दिवस ■ पहिल्या दोन कसोटीत इंग्लंडकडून खेळणाऱ्या रेहान अहमदचे वय १९ वर्षे १७३ दिवस

• दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात समावेश करण्यात आलेल्या जेम्स अँडरसनचे वय ४१ वर्षे १८७ दिवस

टॅग्स :जेम्स अँडरसनभारत विरुद्ध इंग्लंड