Join us  

INDWvsENGW : मिताली राज अन् झूलन गोस्वामी यांनी मोडला गांगुली,द्रविड, कुंबळे यांचा विक्रम

सात वर्षांनंतर भारतीय महिला संघ कसोटी क्रिकेट खेळणार आहे. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 3:53 PM

Open in App

सात वर्षांनंतर भारतीय महिला संघ कसोटी क्रिकेट खेळणार आहे. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मैदानावर उतरताच मिताली राज ( Mithali Raj) आणि झूलन गोस्वामी ( Jhulan Goswami) यांनी विक्रमाला गवसणी घातली. भारताकडून सर्वाधिक काळ कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूचा मान या दोघींनी पटकावला. या दोघींनी 2002मध्ये एकत्रित पहिली कसोटी खेळली होती आणि आज त्यांनी लाँगेस्ट करियरमध्ये नाव दाखल केले.  या दोघींनी भारतीय पुरुष संघाचे माजी खेळाडू राहुल द्रविड व सौरव गांगुली यांचाही विक्रम मोडला.

मिताली आणि झूलन यांनी 14 जानेवारी 2002मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. आज त्यांच्या कसोटी कारकिर्दीला 19 वर्ष व 154 दिवस पूर्ण झाले. महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची वेरा बर्ट ( 20 वर्ष व 335 दिवस) व इंग्लंडची मॅरी हाईड ( 19 वर्ष व 211 दिवस) यांच्यानंतर भारतीय जोडीचा क्रमांक येतो. राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी या दिग्गजांनाही इतकी वर्ष खेळता आले नाही. 

कुंबळेनं 18 वर्ष 88 दिवस, द्रविडनं 15 वर्ष व 222 दिवस आणि गांगुलीनं 12 वर्ष व 143 दिवस भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं. द्रविडनं 164, कुंबळेनं 132 व गांगुलीनं 113 कसोटी सामने खेळले. मिताली राज 1999 पासून वन डे क्रिकेट खेळतेय. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम तिच्याच नावावर आहे.  17 वर्षीय शेफाली वर्माचे पदार्पण...भारतीय संघ - स्मृती मानधना, शेफाली वर्मा, पूनम राऊत, मिताली राज ( कर्णधार), हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, तानिया भाटीया, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे इंग्लंडचा संघ - टॅमी बीयूमोंट, लौरेन विनफिल्ड-हिल, हिदर नाईट, नॅट स्वीव्हर, अॅमी जोन्स, सोफीया डंकली, जॉर्जिया एलवीस, कॅथरीन ब्रंट, अॅन्या शुब्रसोले, सोफी एस्क्लेस्टोन, केट क्रॉस.

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघमिताली राजभारत विरुद्ध इंग्लंड