Join us  

BREAKING:  विराट कोहली सराव सामन्यात का नाही खेळला?; समोर आली मोठी अपडेट्स, डॉक्टरांनी दिलाय विश्रांतीचा सल्ला!

India Tour of England : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या विराट अँड कंपनीच्या सराव सामन्यालाही आजपासून सुरुवात झाली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 7:31 PM

Open in App

India Tour of England : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या विराट अँड कंपनीच्या सराव सामन्यालाही आजपासून सुरुवात झाली. सराव सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळत आहे. रोहितनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारताचे ३ फलंदाज ८० धावांवर माघारी परतले होते.  लिंडल जेम्सनं घेतल्या दोन विकेट्स घेतल्या. रोहित शर्मा ३३ चेंडूंत ९ धावा, मयांक अग्रवाल ३५ चेंडूंत २८ धावा अन् चेतेश्वर पुजारा ४७ चेंडूंत २१ धावांवर माघारी परतले असून लोकेश राहुल व हनुमा विहारी खिंड लढवत आहे.

विराट, अजिंक्य हे का नाही खेळले?

आजपासून सुरू झालेल्या सराव सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, इशांत शर्मा व आर अश्विन हे महत्त्वाचे खेळाडू नसल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या. पण, या सामन्यात वॉशिंग्टन सूंदर आणि आवेश खान हे भारताचे दोन खेळाडू प्रतिस्पर्धी कौंटी एकादश संघाकडून खेळत आहेत. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दंडावर काळी फित बांधून मैदानावर उतरले. काही दिवसांपूर्वी १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य यशपाल शर्मा यांचे निधन झाले आणि त्यांना आदरांजली म्हणून टीम इंडियाच्या खेळाडूंनी काळी फित बांधली.  

बीसीसीआयच्या वैद्यकिय टीममधून मिळालेल्या वृत्तानुसार भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या पाठीत मंगळवारी दुखू लागले आणि त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो पहिल्या सराव सामन्यात खेळला नाही. ( Captain Virat Kohli felt some stiffness in his back on late Monday evening and he has been advised rest from the three-day first-class warm-up game by the BCCI Medical Team.) अजिंक्य रहाणेलाही हॅमस्ट्रींग दुखापत झाली आहे आणि त्याल इंजेक्शन घ्यावे लागले आहेत. त्यामुळे तोही सराव सामन्यासाठी उपलब्ध नाही. बीसीसीआयची वैद्यकिय टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. पहिल्या कसोटीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल.  

भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, लोकेश राहुल ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह,  मोहम्मद सिराज ( Playing XI : Rohit Sharma (Capt), Mayank Agarwal, Cheteshwar Pujara, Hanuma Vihari, KL Rahul (WK), Ravindra Jadeja, Axar Patel, Shardul Thakur, Umesh Yadav, Jasprit Bumrah, Md Siraj)

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीअजिंक्य रहाणे