Join us  

भारताच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कोरोनामुळे गमावले आईचे छत्र

विराट कोहली अँड टीमसह यंदा प्रथमच भारतीय महिला संघही पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 1:41 PM

Open in App

विराट कोहली अँड टीमसह यंदा प्रथमच भारतीय महिला संघही पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं नुकतीच संघाची घोषणा केली. या दौऱ्यासाठी निवड झालेल्या संघातील युवा खेळाडू प्रिया पूनिया ( Priya Punia) हिच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. प्रियाच्या आईनं १८ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. तिनं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून दुःखाला वाट मोकळी केली. ''तू मला नेहमी का कणखर राहण्यास सांगायचीस, हे आता लक्षात येतंय. एक दिवस तुला गमावण्याचं दुःख मला सहन करावं लागेल, हे तुला माहीत होतं. आणि त्यासाठी तू मला कणखर  बनवलंस. पण मला तुझी आठवण येतेय आई. तू माझ्यापासून कितीही लांब असलीस, तरी तू नेहमी माझ्यासोबत आहेस. मला योग्य मार्ग दाखवणार. आयुष्यात सर्व प्रसंगांचा स्वीकार करणं अवघड आहे,''अशी पोस्ट तिनं लिहिली. महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघातील खेळाडूवर संकट; सामन्यानंतर मिळाली त्याला व पत्नीला जीवे मारण्याची धमकी

यावेळी प्रियानं सर्वांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. याआधी भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती हिनं कोरोनामुळे आई व बहिणीला गमावलं. आर अश्विनच्या कुटुंबातील १० सदस्यांचा कोरोनाशी संघर्ष सुरू आहे. युझवेंद्र चहलच्या आई-वडिलांनाही कोरोना झाला आहे. प्रिया पुढील महिन्यात भारतीय महिला संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे भारतीय संघाच्या कसोटी व वन डे संघाची ती सदस्य आहे. २०१९मध्ये तिनं न्यूझीलंडविरुद्ध वन डे संघातून पदार्पण केलं होतं. तिनं पाच वन डे सामन्यांत ४३.७५च्या सरासरीनं १७५ धावा केल्या आहेत. Sushil Kumar : सुशील कुमारला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जाहीर केलं १ लाखांचं बक्षीस प्रिया आघाडीच्या क्रमांकाची फलंदाज आहे. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात तिचा जन्म झाला. प्रियाचे वडील सुरेंद्र पूनिया हे भारतीय सर्व्हे विभागाता क्लार्क आहेत. मुलीचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी शेतीचं खेळपट्टीत रुपांतर केलं.   वडिलांनी क्रिकेटसाठी तयार केलं मैदान, मुलीनं टीम इंडियात जागा मिळवून वाढवली शान

टॅग्स :बीसीसीआयभारत विरुद्ध इंग्लंडकोरोना वायरस बातम्या