Join us  

इंग्लंडचा भारत दौरा स्थगित? IPL 2020 साठी चाललीय खटाटोप!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13 व्या मोसमासाठी ही खटाटोप सुरू असल्याची चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 12:42 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. कोरोना व्हायरसचा युरोपियन फुटबॉल लीग्सना सर्वाधिक फटका बसला आहे. 117 दिवसांनंतर इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आणि पहिल्याच कसोटी सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिजनं 4 विकेट्स राखून इंग्लंडवर विजय मिळवला. पण, भारतात क्रिकेटला कधी सुरुवात होईल, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पण, सप्टेंबरमध्ये होणारी इंग्लंडविरुद्धची मालिका स्थगित करण्यात आली आहे.

आयपीएलच्या निमित्तानं पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटपटूंना मैदानावर उतरलेलं पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. त्यासाठी  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार इंग्लंड क्रिकेट बोर्ड ( इसीबी) सप्टेंबर महिन्यातील भारत दौरा स्थगित करण्याचा विचारात आहे. याकालावधीत बीसीसीआयचा आयपीएल खेळवण्याचा विचार असल्यामुळे इसीबीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या दौऱ्यात इंग्लंड तन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार होता. नियोजित वेळापत्रकानुसार 16 सप्टेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार होती.

पण, अजूनही ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबतचा निर्णय झालेला नाही आणि पुढील आठवड्यात त्याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) घोषणा करण्याची शक्यता आहे. बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आयपीएलमध्ये इंग्लंडचे अनेक खेळाडू खेळतात, पण त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.

यावर्षी आयपीएल खेळवणं ही बीसीसीआयचे प्रमुख लक्ष्य असल्याचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं आधीच स्पष्ट केलं आहे. आशिया चषक स्थगित झाल्यामुळे आयपीएलच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला होता आणि आता इंग्लंड दौऱ्यानं त्यांना बळ मिळालं आहे. पण, भारतात ही लीग होणं तुर्तास तरी शक्य नाही. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 9 लाखांचा पार गेला आहे. त्यामुळे बीसीसीआयसमोर संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका असे दोन पर्याय आहेत, परंतु त्यासाठी त्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

ज्योतिरादित्य, सचिन पायलटनंतर कोण?... राहुल जी?; भारताच्या माजी क्रिकेटपटूची 'कमेंट' व्हायरल

25 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूची कोरोनावर मात; पत्नी अजूनही पॉझिटिव्ह 

कौतुकास्पद! 15व्या वर्षी भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक सुवर्ण अन् आता CBSE बोर्डात केली कमाल

ट्वेंटी-20 लीगचे वेळापत्रक जाहीर; स्मिथ, वॉर्नरच्या फटकेबाजीचा रंगणार थरार 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआयपीएल 2020