Join us  

भारताचे लक्ष्य मालिका, विजय दुसरी टी-२० लढत आज : लंकेविरुद्ध पुन्हा वर्चस्व गाजविण्यास सज्ज

बलाढ्य भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुस-या टी-२० लढतीत वर्चस्व मिळवून आज शुक्रवारी मालिका विजय साजरा करण्याच्या तयारीत आहे.लंका संघाची ‘साडेसाती’ संपायचे नाव घेत नाही. कटकच्या पहिल्या सामन्यात हा संघ ९३ धावांनी दारुण पराभूत झाला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 1:25 AM

Open in App

इंदूर : बलाढ्य भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुस-या टी-२० लढतीत वर्चस्व मिळवून आज शुक्रवारी मालिका विजय साजरा करण्याच्या तयारीत आहे.लंका संघाची ‘साडेसाती’ संपायचे नाव घेत नाही. कटकच्या पहिल्या सामन्यात हा संघ ९३ धावांनी दारुण पराभूत झाला. ही लढत एकतर्फी झाल्याने कमकुवत संघाविरुद्ध वारंवार मालिकेचे आयोजन का केले जाते, हा प्रश्न उपस्थित होते आहे. भारताने घरच्या मैदानावर लंकेवर एकतर्फी विजयाची नोंद केल्यामुळे आगामी द. आफ्रिका दौ-यात या विजयाचा लाभ होईल, अशी चिन्हे नाहीत. नियमित कर्णधार विराट कोहली, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीतही लंकेला विजयाचा मार्ग शोधता आलेला नाही. हा संघ अँजेलो मॅथ्यूजच्या कामगिरीवरच विसंबून आहे.लंकेचे खेळाडू भारतीय गोलंदाजी आणि फलंदाजीचा सामना करण्यात अपयशीच ठरले. दुसरीकडे यझुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी आंतरराष्टÑीय पदार्पण केल्यापासून लवकरच संघात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. दीर्घकाळापासूनसंघात असलेले थिसारा परेरा, उपुल थरंगा आणि मॅथ्यूज यांनी चांगली कामगिरी करीत लंका संघात नवे स्फुल्लिंग चेतविण्याची गरज आहे. भारतानेही सावध राहूनच खेळायला हवे. कमुकवत संघाविरुद्ध चुकून पराभव झाला तरी नकारात्मकसिद्ध होतो, याची जाणीव ठेवावी लागेल. (वृत्तसंस्था)उभय संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, यझुवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुड्डा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी आणि जयदेव उनाडकट.श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशाल परेरा, धनुष्का गुणतिलक, निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रम, दासुन शनाका, चतुरंगा डिसिल्व्हा, सचित पाथिराना, धनंजय डिसिल्व्हा, नुआन प्रदीप, विश्व फर्नांडो आणि दुष्मंत चामीरा.सामना : सायंकाळी ७ वा.स्थळ : होळकर स्टेडियम

टॅग्स :क्रिकेटश्रीलंकाभारतीय क्रिकेट संघ