Join us

भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार : आकाश चोप्रा

पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारतीय संघच प्रबळ दावेदार आहे, असे मत भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 04:20 IST

Open in App

मुंबई : पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारतीय संघच प्रबळ दावेदार आहे, असे मत भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने व्यक्त केले.येथील एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला, ‘विश्वचषक स्पर्धेला अद्याप थोडा वेळ आहे. मात्र भारत विश्वचषक उंचावेल, असे मला वाटते. जेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत.’तो म्हणाला, ‘संघाची फलंदाजी चांगली आहे, त्याचबरोबर संघात काही जबरदस्त फलंदाजही आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये होणाºया यास्पर्धेत भारताला काही अडचण येणार नाही.चोप्रा म्हणाला, ‘अंबाती रायुडूने संघातील चौथ्या क्रमांकावरआपला दावा सांगताना सर्व काही केले आहे. या जागेसाठी किमान १२ जणांना संधी देण्यात आली. मात्र मला वाटते रायुडूच या जागेसाठी योग्य असल्याचे मला वाटते.’तो म्हणाला, ‘विराटने आयपीएलदरम्यान गोलंदाजांना विश्रांती देण्याची मागणी केली आहे. यावरही विचार करायला हवा.’चोप्रा म्हणाला, ‘गोलंदाजांबरोबरच फलंदाजांच्या विश्रांतीविषयीही बीसीसीआयने विचार करायला हवा.’