Join us  

भारताच्या माजी फलंदाजाची दादर चौपाटीच्या सफाईसाठी बॅटींग; रविवारी स्वच्छता मोहीम

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज दादर चौपाटीच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 9:04 AM

Open in App

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. या मोहीमेंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवर हातात झाडू घेऊन साफसफाई करताना दिसले. मुंबईतही अनेक सेलिब्रिटी आपापले परिसर स्वच्छ करताना दिसले. येत्या रविवारी दादर चौपाटीवर असेच चित्र दिसण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज दादर चौपाटीच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहे. 

दादर हे मुंबईतील प्रचंड गर्दीचे ठिकाण... दिवसाला येथे लाखो लोक येतात.. दादर चौपाटी हे येथील प्रमुख पर्यटनाचे ठिकाण.. पण या चौपाटीची अवस्था पाहता येथे घाणीचे साम्राज्यच अधिक दिसते. त्यामुळे या चौपाटीच्या स्वच्छतेसाठी एका संस्थेने पुढाकार घेतला असून खेळाच्या माध्यमातून येत्या रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. 

भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी हा या मोहीमेचा सदिच्छादूत आहे. २ ऑक्टोबरला सकाळी ८:३० वाजता दादरच्या किर्ती महाविद्यालयापासून ही मोहीम सुरू होइल. 'Let's clean & play together' या थिमखाली ही स्वच्छता होणार आहे. स्वच्छतेबरोबर चौपाटीवर बीच बॉलिंग, बीच क्रिकेट आणि रस्सीखेच असे खेळही होणार आहे. 

टॅग्स :विनोद कांबळीक्रिकेट