Join us  

ऐतिहासिक विजयासह ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट करण्याचा भारताचा प्रयत्न

आज निर्णायक सामना; गोलंदाजीमध्ये योग्य ताळमेळ साधण्याचे भारतीयांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 6:47 AM

Open in App

मेलबर्न : आत्मविश्वास बळावलेला भारतीय संघ शुक्रवारी तिसºया आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध बाजी मारुन दौºयाचा ऐतिहासिक शेवट करण्याच्या निर्धाराने सज्ज झाला आहे. भारताने आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकून इतिहास घडविला. असाच विक्रम एकदिवसीय मालिकेत घडेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले.

‘आम्ही इतिहास न बघता केवळ वर्तमानावर लक्ष केंद्रित करतो,’ असे कोहली व रवी शास्त्री यांनी दौºयाच्या सुरुवातीला सांगितले होते. तथापि कसोटीसह एकदिवसीय मालिका जिंकून पहिल्यांदा इतिहास घडविण्याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापनाचा असेल.भारताने येथे द्विपक्षीय एकदिवसीय मालिका कधीही जिंकली नाही. १९८५ मध्ये विश्व चॅम्पियनश्पि तसेच २००८ मध्ये सीबी मालिका जिंकली होती. मागच्यावेळी २०१६ मध्ये भारताला येथे एकदिवसीय मालिका १-४ ने गमवावी लागली. भारताने हा सामना जिंकल्यास २०१८-१९ च्या दौºयात एकही मालिका न गमविण्याचा विक्रम भारताच्या नावे दाखल होईल.

भारतीय संघाची एकमेव चिंता असेल ती पाचव्या गोलंदाजाचा पर्याय शोधणे. मालिकेत भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी प्रभावी ठरले, तर कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांनी फिरकीची बाजू यशस्वीपणे सांभाळली. खलील अहमद व मोहम्मद सिराज अपयशी ठरले. त्यामुळे पाचवा गोलंदाज म्हणून अष्टपैलू विजय शंकर व युझवेंद्र चहल पर्याय ठरू शकतील.प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, विजय शंकर, खलील अहमद, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज .आॅस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅलेक्स केरी, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हँडस्कोम्ब, मार्कस् स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नॅथन लियोन, पीटर सिडल, झाय रिचर्डसन, मिशेल मार्श, बिली स्टानलेक, एस्टोन टर्नर, अ‍ॅडम झम्पा आणि जेसन बेहरेनडोर्फ.

टॅग्स :आॅस्ट्रेलिया