Join us  

ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारताच्या 'या' क्रिकेटपटूने रचला इतिहास, ऐकाल तर हैराण व्हाल

भारताच्या एका क्रिकेटपटूने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये एक इतिहास रचला आहे. त्याने जी कामगिरी केली, ती कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत करता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 4:42 PM

Open in App

मुंबई : ट्वेन्टी-20 क्रिकेट हा सध्याच्या घडीला सर्वात जलद फॉरमॅट आहे. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये गुणवत्ता आणि फिटनेस यांचा संगम असणे गरजेचे आहे. भारताच्या एका क्रिकेटपटूने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये एक इतिहास रचला आहे. त्याने जी कामगिरी केली, ती कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत करता आलेली नाही.

या क्रिकेटपटूने एकाच सामन्यात 56 चेंडूंत 136 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीमध्ये त्याने 13 षटकात आणि सात चौकार लगावले, पण फक्त एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने चार षटकांमध्ये तब्बल आठ विकेट्स मिळवत साऱ्यांनाच सुखद धक्का दिला.

सध्याच्या घडीला भारताची कसोटी मालिका वेस्ट इंडिजमध्ये सुरु आहे. त्यामुळे कोणता भारतीय क्रिकेटपटू ट्वेन्टी-20 क्रिकेट खेळत आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचबरोबर सध्या ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या स्पर्धा कुठे सुरु आहेत, हे जाणून घेण्यातही तुम्हाला उत्सुकता असेल.

भारताच्या 30 वर्षीय खेळाडूने कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये हा इतिहास रचला आहे. या खेळाडूचे नाव आहे कृष्णप्पा गौतम. शुक्रवारी रात्री बेंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या एका सामन्यात गौतमने हा इतिहास रचला आहे.

गौतमला अजून तुम्ही ओळखले नसेल, तर त्याची अजून एक चांगली ओळख आहे. गौतम हा आयपीएलमधीलराजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळतो. राजस्थानकडून खेळताना गौतमने दमदार कामगिरी केली आहे. गेल्या मोसमात तर गौतमने आपली अष्टपैलू चमक दाखवत संघासाठी दमदार कामगिरी केली होती.

टॅग्स :आयपीएलराजस्थान रॉयल्स